भोर तालुक्यातील उंबरे येथे घरफोडीत तब्बल ३ लाखांचा ऐवज चोरीला
नसरापूर : भोर तालुक्यातील उंबरे येथे बंद घराची कडी कोयंडा तोडून सोन्याचे दागीने व नगदी रक्कम असा एकूण ३,१४,००० रुपयांचा ऐवज चोरीला गेल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
या घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार, सत्यवान गुलाब खुटवड (वय ५९ वर्षे, रा. उंबरे,ता.भोर, जि.पुणे) यांच्या उंबरे येथील गट नं.५५४ मधील शेतात बांधलेल्या घराचा कडी कोयंडा तोडून अज्ञात चोरट्यांनी आत प्रवेश करून २,७२,००० रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने, ३२,००० रुपये रोख रक्कम आणि १०,००० रुपये किमतीच्या साड्या असा एकूण ३,१४,००० रुपये किमतीचा ऐवज चोरी केली असल्याची फिर्याद गुरुवार (दि.१६ नोव्हेंबर) रोजी राजगड पोलीस स्टेशन येथे नोंदवण्यात आली. फिर्यादी सत्यवान खुटवड हे बीएसटी सेवानिवृत्त असून कुर्ला,मुंबई येथे सध्या रहावयास असून दि. ११ नोव्हेंबर ते १५ नोव्हेंबर या दरम्यान ही घटना घडल्याची तक्रार त्यांनी राजगड पोलिस स्टेशन येथे नोंदवली आहे. राजगड पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून सदर घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरिक्षक सुतनासे करीत आहेत.