जीवन आप्पा कोंडे यांच्या माध्यमातून कापूरहोळ येथील शाळेत ७ लक्ष रुपयांच्या व्यायाम शाळा साहित्यांचा उद्घाटन कार्यक्रम
कापूरहोळ : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये पोलीस किंवा सैन्य भरतीसाठी जाण्याची इच्छा असते. तथापी अशी इच्छा असणाऱ्या विद्यार्थ्यांना गाव पातळीवर व्यायाम साहित्याची उणीव भासते. त्यामुळे व्यायामाची आवड असणाऱ्या विद्यार्थ्यांची गैरसोय होते. ही गोष्ट हेरून श्री शिवाजी विद्यालय नसरापुर भाग शाळा कापूरहोळ या शाळेमध्ये पुणे जिल्हा नियोजन समिती सदस्य जीवन आप्पा कोंडे यांनी त्यांच्या निधीतून ७ लक्ष रुपयांचे व्यायामाचे साहित्य उपलब्ध करून दिले.
शाळेतील मुलांना अद्ययावत साहित्यामूळे व्यायाम करणे सोपे होणार आहे. ही कामे मंजूर झाल्याने परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
जीवन आप्पा कोंडे या वेळेस म्हणाले की, तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे जसे फायदे झाले तसे तोटे हि झाल्याचे पाहावयास मिळतात. घरातील विविध प्रकारच्या कामे करतांना व्यायाम होत असे, परंतु आता सर्व कामे मशीनद्वारे करण्यात येतात. तसेच बैठेकाम जास्त वाढल्यामुळे शरीराची हालचाल होत नाही. याकडे सर्वांनी लक्ष द्वावे. दिवसातील किमान थोडा वेळ व्यायामा करीत द्यावा.
शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्याला जीममध्ये जाण्यासाठी फी भरणे शक्य नसते. त्यामुळे आवड असणाऱ्या गरजू विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार आहे.
या व्यायाम शाळा साहित्यांच्या उद्घाटन कार्यक्रम प्रसंगी श्री शिवाजी विद्यालय नसरापुर भाग शाळा कापूरहोळचे प्राचार्य शिंदे सर, पर्यवेक्षक खोपडे सर, धुमाळ सर, मालुसरे सर, काळे सर, भोसले सर, त्याचप्रमाणे पुणे जिल्हा भाजपा उपाध्यक्ष बाळासाहेब गरुड,भाजपा माजी अध्यक्ष राजाभाऊ गुरव,हरिश्चंद्री ग्रामपंचायत सदस्य शरद लोहार,वागजवाडी ग्रामपंचायत सदस्य समीरजी आवाळे,भाजप भोर तालुका सरचिटणीस दीपक तनपुरे,भाजपा उपाध्यक्ष भोर सुनीलजी पांगारे त्याचप्रमाणे युवा उद्योजक मस्कोबा गाडे,सचिन वीर,सागर गाडे,महेश मालुसरे,ऋषी स्वामी,सागर गाडे,अजय गाडे आणि भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.