माजी सरपंच विकासबाप्पू चव्हाण ग्रामपंचायत सदस्य पदाचा राजीनामा देणारे भोर तालुक्यातील पहिले सदस्य
भोर : मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी भोर तालुक्यातील युवा सरपंच विकासबाप्पू चव्हाण यांनी पेंजळवाडी सदस्य पदाचा राजीनामा दिला असल्याने भोर तालुक्यातील आरक्षणाची धग आता अधिकच तीव्र झाली आहे. भोर तालुक्यातील राजीनामा देणारे ते पाहिले ग्रामपंचायत सदस्य ठरले आहेत.
मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने सुरू केलेल्या आंदोलनास पाठिंबा दर्शविण्यासाठी व या आंदोलनाच्या दृष्टिकोनातून भोर तालुक्यातील पेंजळवाडी गावचे सदस्य विकासबाप्पु चव्हाण यांनी ठोस भूमिका घेऊन समाज बांधवांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्यासाठी पेंजळवाडी गावच्या सदस्य पदाचा राजीनामा दिला आहे.
अशी ठाम भूमिका घेतल्याबद्दल विकसबाप्पू यांचे अभिनंदन केले जात आहे.
मी माझ्या गरीब मराठा बांधवांना लवकर आरक्षण मिळावे, अशी मागणी करत सदस्य पदाचा राजीनामा दिला असून न्यायिक हक्कासाठी हा लढा आहे. यासाठी पूर्णतः समर्थन म्हणून हे पाऊल उचलले असल्याचे विकासबप्पू चव्हाण यांनी सांगितले आहे.
मराठा समाजातील युवकांची पात्रता असतानाही आरक्षणाअभावी शिक्षणात आणि शासकीय नोकरीत होणारं नुकसान ही गोष्ट अत्यंत दुर्दैवी आहे,सर्वच राजकीय पक्ष मराठा समाजाचा फक्त मतदानासाठी वापर करतात, मराठा समाजातील तरुणांची हतबलता बघुन मन व्यथीत होते,अशा परस्थितीत सदस्य पदावर राहने मनाला वेदनादायक ठरत असल्याने मी सदस्य पदाचा राजीनाम दिला आहे, असे त्यांनी निनाद महाराष्ट्र न्यूज सोबत बोलताना सांगितले.