सकल मराठा समाज नसरापूर(भोर) यांच्या वतीने रास्ता रोको, राजकीय पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तीस आंदोलनात भाषण करण्यास बंदी.
नसरापूर: मराठा आरक्षणा संदर्भात मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ संपूर्ण महाराष्ट्र पेटलेला दिसत आहे. त्यातच पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील आरक्षणाची धग आता अधिकच तीव्र होताना दिसत आहे.भोर तालुक्यातील बऱ्याच गावांमधून राजकीय पुढाऱ्यांना प्रवेश बंदी केल्याचे बोर्ड लावण्यात आले आहेत. तालुक्यातील अनेक गावातून मराठा आरक्षण संदर्भात साखळी उपोषणासह वेगवेगळ्या स्वरूपाचे आंदोलन सुरू आहेत.
त्याचाच एक भाग म्हणून सकल मराठा समाज नसरापूर यांच्या वतीने मंगळवार(दि.३१ऑक्टोबर)रोजी नियोजन बैठकीचे आयोजन केले होते.या वेळेस बैठकीत ठरल्या प्रमाणे सकल मराठा समाज नसरापूर यांच्या वतीने रविवार(५ नोव्हेंबर) रोजी पुणे-सातारा महामार्गावर रास्ता रोको आंदोलन घेण्यात येणार आहे. आंदोलनात कोणत्याही राजकीय पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तीस भाषण करण्यास बंदी घालण्यात आली आहे. हा मोर्चा नसरापूर बाजारसमिती पासून सुरू होऊन मराठी शाळेपासून घोषणा देत चालत लक्ष्मीगंगा गार्डन येथे पोचणार आहे. गार्डन समोर पुणे-सातारा महामार्गावर वर रास्ता रोको घेण्यात येणार आहे. राजकीय हेतू घेऊन कोणी आंदोलनात सहभागी होणार असेल तर त्यांनी सहभागी न होण्याचा सल्ला सकल मराठा समाजाच्या वतीने देण्यात आला आहे.बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन या वेळेस सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आले.