फिटनेस उद्योगात यशस्वीरित्या ११ वर्ष पूर्ण केल्याबद्दल कापूरहोळ येथील ‘किंग्ज जिम’ने वर्धापनदिन केला साजरा
कापूरहोळ : किंग्ज जिम(कापूरहोळ, ता. भोर) यांच्या वतीने गुरुवारी(दि. ६ जून) रोजी अकरावा वर्धापनदिन साजरा करण्यात आला. ज्यामध्ये त्यांच्या सर्व सदस्यांनी मोठ्या उत्साहाने भाग घेतला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. किंग्ज जिम हे फिटनेस उद्योगातील विश्वासार्ह नाव म्हणून ओळखले जाते.
भोर तालुका युवासेना प्रमुख स्वप्नील गाडे यांनी ६ जुन २०१३ रोजी या जिमची स्थापना केली. या जिममध्ये ५०० हून अधिक सदस्यांचा सदस्यत्व असण्याचा मान आहे. जिममध्ये मागील २ वर्षात आधुनिक सामग्री मध्ये वाढ केली असून त्यामध्ये प्रामुख्याने ट्रेड मिल, सायकल, क्रॉस फिट, वेट ट्रेनिंग, कार्डिओ ट्रेनिंग, बॉक्सिंग ट्रेनिंग, यांसारख्या आधुनिक सुविधा उपलब्ध केल्या आहेत. वर्धापन दिनाच्या कार्यक्रमा निमित्त तरुण पिढीला उत्तम आरोग्य आणि तंदुरुस्तीसाठी प्रोत्साहित करण्यासाठी किंग्ज जिमचे व्यवस्थापक गोपाळ गाडे व निखील गाढवे यांच्यावतीने केक कापण्यात आला. अतुलनीय सेवा आणि मूल्ये देऊन भविष्यातील निरोगी पाया तयार करण्यात आणि टिकून राहण्यासाठी किंग्ज जिमने यशस्वीरित्या यश मिळवले आहे.
या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमासाठी हरिश्चंद्री गावचे माजी सरपंच पांडुरंग गाडे, निलेश बोटे, विनोद भोसले, रोहन धाडवे, अजय धाडवे, विक्रम चालेकर, विक्रांत पाचकाळे, प्रथमेश बाठे, ऋतिक गाडे, आकाश जाधव, रोहन गाढवे, अनंत झरेकर , सौरभ बाठे, संकेत बाठे, ऋतिक लोहार, गणेश अहिरे, स्वप्नील वाल्हेकर, हिमेश पांगारे, वैभव पांगारे, अथर्व गिरे, सूरज गोळे तसेच किंग्ज जिमचे बरेचसे सदस्य उपस्थित होते.