भोर तालुक्यातील राजापुर गावात ग्रामस्थांचे एक दिवसीय लाक्षणिक उपोषण
भोर : मराठा आरक्षणा संदर्भात मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ संपूर्ण महाराष्ट्र पेटलेला दिसत आहे. त्यातच पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील आरक्षणाची धग आता अधिकच तीव्र होताना दिसत आहे.भोर तालुक्यातील बऱ्याच गावांमधून राजकीय पुढाऱ्यांना प्रवेश बंदी केल्याचे बोर्ड लावण्यात आले आहेत. तालुक्यातील अनेक गावातून मराठा आरक्षण संदर्भात साखळी उपोषणासह वेगवेगळ्या स्वरूपाचे आंदोलन सुरू आहेत.त्यातच राजापुर गावातील ग्रामस्थ महिला मोठ्या संख्येने उपोषण स्थळी उपस्थित राहुन घोषणा देत आहेत.मनोज जरांगे तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है! आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे घोषणांनी सारा परिसर दुमदुमून सोडला आहे.
यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून उपोषणास सुरुवात केली.राजापुर गावातील संरपंच संतोष बोबडे,तसेच सुरेश बागल, दिलीप बोबडे, हर्षद बोबडे सर, श्रीरंग खउटवड, चंद्रकांत बोबडे, महेश बोबडे, माऊली बोबडे, ज्ञानेश्वर बागल,यांनी पुष्पहार अर्पण करून उपोषणास सुरुवात केली.आजी माजी संरपंच तंटामुक्ती अध्यक्ष, सोसायटी चेअरमन, उपस्थित होते.
युवकांनी व ज्येष्ठांनी आपले विचार व्यक्त केले.हर्षद बोबडे सर यांनी विचार व्यक्त केले.तसेच संदिप बोबडे,दिलीप बोबडे, शांताराम खुटवड, महेश बोबडे, नवनाथ बागल,दिलीप बागल, सुनील मोरे, बाळासाहेब खुटवड,माऊली बोबडे, चंद्रकांत बोबडे, श्रीरंग खुटवड, रमेश बोबडे, गोंविद बोबडे, प्रमोद बोबडे, सतीश बोबडे,महिला आघाडीच्या अध्यक्षा कल्पना खुटवड, आश्विनि बागल,ज्योती मांढरे, जयश्री बोबडे,प्रियंका खुटवड यांनी विचार व्यक्त केले.