वीर धाराऊ माता गाडे पाटील वाड्यावर ग्रामस्थांच्या वतीने स्मारक परिसरात एक हजार एक दिवे लावून दीपोत्सव साजरा
कापूरहोळ: दिवाळीच्या निमित्ताने केवळ घरातच नव्हे, तर विविध गडकोटांवर, मंदिरांवर दीपोत्सव करून सगळीकडे दिवाळी साजरी करण्यात येत आहे. सहस्रो दिवे लावून, पोवाडे, गोंधळ असा कार्यक्रम आयोजित करून छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेल्या हिंदवी स्वराज्याचे गुणगान सगळीकडे या दिवाळी निमित्त करण्यात येत आहे.
यातच धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या दुधाई वीर धाराऊ माता गाडे पाटील यांच्या वाड्यावर कापूरहोळ (ता.भोर. जि.पुणे) येथे ग्रामस्थांच्या वतीने आयोजित केलेल्या दीपावली पाडवा या दिवशी दीपोत्सवात एक हजार एक पणत्यांची वीर धाराऊ माता गाडे पाटील स्मारकात व स्मारक परिसरात सजावट करण्यात आली होती.
तसेच स्मारकावर आकर्षक विद्युत रोषणाई आकर्षक रांगोळ्या, यांनी हा दीपोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला.दीपोत्सव कार्यक्रमादरम्यान बहुसंख्य लोक उपस्थित होते. या वर्षीचा दीपोत्सव १४ नोव्हेंबर २०२३ दिवाळी पाडवा या दिवशी साजरा केला. त्यानिमित्त स्मारक परिसरामध्ये दिव्यांची मनमोहक आरास केली होती.
यावेळी विशेषतः वीर धाराऊ माता गाडे पाटील ट्रस्ट चे अध्यक्ष अमित गाडे पाटील, बाबुराजे गाडे पाटील, मयुर गाडे पाटील, संतोष गाडे पाटील, रामदास गाडे पाटील, मच्छिंद्र गाडे, गजानन गाडे, आमर गाडे, मुकुंद पिसाळ, गोरख आहिरे, सुदाम तात्या गाडे, पांडुरंग गाडे आदी उपस्थित होते.