महात्मा फुले यांचे विचार आज सुद्धा प्रेरणादायी : आमदार दीपक चव्हाण
फलटण : स्त्री शिक्षणाचे जनक व थोर समाजसुधारक क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची आज पुण्यतिथी(२८ नोव्हेंबर)आहे. ज्योतिबा गोविंदराव फुले हे देशातील सर्वात महत्त्वाचे तत्त्वज्ञ मानले जातात.सत्यशोधक समाज संस्थेद्वारे त्यांनी समाजसुधारण्याचे व स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवण्याचे काम केले.
ज्योतिबांनी शेतकरी आणि बहुजन समाजाच्या समस्यांना केंद्रस्थानी ठेवून आपले आयुष्यात कामकाज केले. महात्मा फुले यांचे विचार आजच्या कळमध्ये सुद्धा प्रेरणादायीच आहेत; असे मत फलटण – कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार दीपक चव्हाण यांनी व्यक्त केले.
फलटण येथील महात्मा फुले चौक येथे असणाऱ्या महात्मा फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अपर्ण केल्यानंतर आमदार चव्हाण बोलत होते. यावेळी फलटण तालुक्यातील ओबीसी बांधव मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.