भोर ला दुष्काळ यादीतून वगळले! यामागचे राजकारण काय?
भोर : महाराष्ट्रातील दुष्काळ ग्रस्त तालुक्यांची यादी नुकतीच जाहीर झाली आहे. त्यांच्या तालुक्यांचा परिस्थितीचा निकष, आणेवारी पाहता, भोर तालुक्याचा दुष्काळग्रस्त यादीत समाविष्ट होणे गरजेचे होते. भोर ला वेढलेल्या व लगत असलेले खंडाळा,वाई,पुरंदर,बारामती,इंदापूर, दौंड तालुके यांचा समाविष्ट होतो,मात्र भोर चा समाविष्ट का होत नाही? ही तालुक्या बाबत मोठी शोकांतिका आहे.
भोर तालुका हा अती पर्जन्यमानाचा तालुका असल्यामुळे येथील बहुतांश शेतकऱ्यांचा भात शेतीकडे कल असतो.यंदा म्हणावा असा वेळेत पाऊस न पडल्यामुळे भात व इतर पिकांच्या उत्पादन क्षमतेवर त्याचा फटका पडला. मात्र या बाबत कृषी विभागीय अधिकाऱ्यांनी तालुक्याच्या जुन्या आणेवारी व निकषानुसार पंचनामे करून शासनास चुकीची माहिती दिली अशी तालुक्यात चर्चा आहे. मुळातच पाऊसाचा फटका संपूर्ण महाराष्ट्राला बसला आहे.त्यातून भोर कसा वाचेल?हे निकष व चुकीच्या पद्धतीचा अहवाल सादर झाल्यामुळे हजारो शेतकऱ्यांना लाखो रुपयांचे नुकसान सोसावे लागत असल्याचे भोर मधील शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.अनेक शेतकरी संघटनांनी याबाबत बैठका घेऊन चर्चासत्र सुरू केलेले आहे.त्या चर्चा सत्रामध्ये पावसाचे किती पर्जन्यमान झाले.पिकणीहाय नुकसानाचा अंदाज वर्तविला गेला आहे. मात्र कृषी विभागाच्या चुकीच्या अथवा सातबाऱ्यावरील जुन्या आणेवरीमुळे शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. याबाबत कृषी खात्याने दुष्काळ ग्रस्त अहवालाची पूनस्था पाहणी करून दुष्काळ ग्रस्त अहवाल सादर करावा. त्यामुळे अल्पभूधारक व कंबरडे मोडलेल्या भोरच्या शेतकरी वर्गास आधार मिळेल अशी जनतेची प्रतिक्रिया आहे.
याबाबत भोर तालुका कृषी अधिकारी देवेंद्र ढगे यांच्या बरोबर संवाद साधला असता त्यांनी सांगितले की, तालुका दुष्काळग्रस्त जाहीर होण्यासाठी २१ दिवसांचा पाऊसाचा सलग खंड लागतो. तर भोर हा दुर्गम भाग असल्यामुळे भोर मध्ये कायम ५ एम एम ते १० एम एम पाऊस पडत असतो. दुष्काळ ग्रस्त तालुका जाहीर होण्यासाठी १ एम ते २ एम एम च्या वरती पाऊस झाला नाही, तरच तो तालुका दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर होतो. या बाबीमुळे भोर तालुक्याचा दुष्काळग्रस्त तालुक्यात समावेश होत नसल्याचे त्यांनी या वेळेस सांगितले.