मुळशीतील १६ तरुणांचा लडाखपर्यंत सायकल प्रवास
पुणे : शिवरायांचे स्मरण म्हणून संपूर्ण देश सायकलवर पिंजून काढायची मोहीम आखून ‘माणसं जिवाभावाची’ हा समूह कामाला लागला आणि अखेर मुळशीतील जिगरबाज मावळ्यांच्या टीमने ‘लेह(खारदूंगला पास) ते कन्याकुमारी’ असा तब्बल ४२८० किलोमीटर सायकल प्रवास लेह लडाखपर्यंतचा प्रवास पूर्ण केला.
मोहिमेची सुरुवात बाणेर येथील छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या स्मारकाला अभिवादन करुन, रुग्णवाहिका आणि सायकल पुजन करून दि.२४ सप्टेंबर रोजी करण्यात आली. प्रत्यक्ष मोहिम दि.३० सप्टेंबर रोजी सकाळी १० वा. जगातील सर्वात उंच शिखर खरदूंग ला (लेह-लडाख) इथून करण्यात आली होती.
या सायकल मोहिमेत (लेह खारदूंगला) इथून पुणे परिसरातील मुळशीतील विनायक दारवटकर, किरण शेळके, हनुमान जांभूळकर, दत्तात्रय म्हाळसकर, संदीप गोडांबे, विशाल डुंबरे, राकेश धावडे आणि यांना मदतीसाठी अशोक सरपाटील, राजेंद्र बेंद्रे, विश्वास कळमकर, दादाराव दाभाडे, संदीप कळमकर, प्रकाश खाणेकर, गणेश जाधव सहभागी झाले आहेत. यावेळी या मावळ्यांनी छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पुजन करून शिवावंदना घेऊन उत्साहपूर्ण वातावरणात सायकल मोहीमेला सुरुवात केली.
या टीमने याआधी बऱ्याच मोहिमा यशस्वी पार केल्या आहेत. जसे की आग्रा ते राजगड ‘गरुडझेप मोहीम’, ‘पानिपत मोहीम’, ‘राजगड ७५ वेळा सर’; पण ही मोहीम काही वेगळीच होती. या मोहिमेत सायकलचा मार्ग ठरला जगातील सर्वांत उंच मार्ग जिथं आहे ते ठिकाण खारदुंगलापास ते कन्याकुमारी मोहिमेचे, शिवरायांचे स्वप्न असे हिमालय अटक ते कटक आणि हे स्वप्न अठराव्या शतकात मराठ्यांनी पूर्ण केलं, पण राजकीय मानसिकतेत आपला देश विभागला गेला आणि आजचा जो हिंदुस्थान आहे सिंधू नदी खारदुंगलापास लेहपासून ते कन्याकुमारीपर्यंत यात १२ राज्ये आणि ५४ मुख्य शहरे येतात तोच शिवस्मरण मार्ग. ‘शिवराय असे शक्तिदाता’ हे घोषवाक्य घेऊन मराठे मावळे लेहला पोहोचले. प्रवास अतिशय खडतर होता, खरदुंला येथे ऑक्सिजन कमी असल्याने दम लागणे, डोके दुखणे, त्यामध्ये हाडे गोठवणाऱ्या थंडीला त्यावेळी सुरुवात झाली असल्याचे त्यांनी या वेळेस सांगितले.