चांदणी चौकातील पुलावरील खड्ड्यामुळे सुप्रिया सुळे यांची चांदणी चौकाला भेट
पुणे : खासदार सुप्रिया सुळे यांनी पुणे येथील चांदणी चौकाच्या कामाची आज पाहणी केली.उद्घाटन होऊन चार पाच महिने होत नाहीत तोवर या रस्त्यावर खड्डे पडत आहेत. निनाद महाराष्ट्र न्यूज ने ही बातमी बुधवार (१ नोव्हेंबर) रोजी निदर्शनास आणून दिली होती. रस्त्याच्या गुणवत्तेबरोबरच या संपुर्ण कामाची श्वेतपत्रिका काढणे गरजेचे आहे. त्याचबरोबर या रस्त्यावर पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेचाही मुद्दा गंभीर आहे. आजही अनेकजण धोकादायक पद्धतीने रस्ता ओलांडत आहेत. त्यामुळे या ठिकाणी त्यांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना करणे गरजेचे आहे.
त्यामुळे केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांची भेट घेऊन यावर चर्चा केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी सुरक्षिततेला प्राधान्य देऊन रस्त्याच्या संबंधित सर्व त्रुटी दूर करुण्याच्या सूचना राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना दिल्या.
याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे जिल्हा कार्याध्यक्ष महादेव कोंढरे, खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष सोपान काका चव्हाण, माजी नगरसेवक सचिन दोडके, पुणे शहर युवकाध्यक्ष किशोर कांबळे, कुणाल वेडे पाटील, किरण वेडे पाटील, महामार्ग प्राधिकरण अधिकारी यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते आदी उपस्थित होते.