एक हात मदतीचा! कापूरहोळ येथील कुटुंबास माणुसकीच्या नात्याने आर्थिक मदतीचे आवाहन
कापूरहोळ : कोरोनामुळे दोन वर्षांपूर्वी भालचंद्र अरुण पुरोहित (वय ३८वर्षे) आजारी पडले होते. त्याच वेळी त्यांच्या हृदय व फुफ्फुसांची कार्यक्षमता घटली होती. सध्या त्यांना श्वास घेणे अवघड होत चाललेले असून, उपचारासाठी ऑक्सिजनवर ठेवण्यात आलेले आहे. त्यांची पत्नी सुजाता कुंभार-पुरोहित या जिल्हा परिषद शाळेत उपशिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी आजवर भालचंद्र यांच्या उपचारासाठी लाखो रुपये खर्च केले आहेत. मात्र डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार भालचंद्र यांचे हृदय आणि फुफ्फुसाचे प्रत्यारोपण करण्याची. आवश्यकता आहे. त्यासाठी त्यांना ५५ लाख रुपये खर्च आहे. परिस्थिती बेताची असलेल्या भालचंद्र यांना सध्या आर्थिक मदतीची आवश्यकता आहे. तरी प्रत्येक व्यक्तीला त्यांच्या परीने जी मदत करता येईल तेवढी करावी ही अपेक्षा. ९५४५१०५६४३ हा त्यांचा संपर्क क्रमांक असून खाली दिलेला त्यांचा बँक खाते क्रमांक आहे.
बँक ऑफ इंडिया
खाते क्रमांक: 083118210002212
आयएफएससी क्रमांक: BKID0000831
फोन पे/गूगल पे: 9545105643
भालचंद्र पुरोहित यांच्या पत्नी सुजाता पुरोहित यांचे मदतीसाठी चे आवाहन
मी सुजाता हनुमंत पुरोहित कुंभार जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कापूरहोळ तालुका भोर जिल्हा पुणे येथे उपशिक्षिका म्हणून काम करीत आहे मुक्काम पोस्ट आंबवणे तालुका वेल्हा जिल्हा पुणे माझे पती हनुमंत अरुण पुरोहित वय ३८ वर्ष एक मुलगा ७ वर्ष व एक मुलगी २ वर्ष असा आमचा सुखी परिवार, पण दैव परीक्षा घेते म्हणतात ना ते हेच माझे पती हनुमान अरुण पुरोहित वय वर्षे ३८ यांना दोन वर्षांपूर्वी कोरोना झाला होता कोरोना बरा व्हावा म्हणून औषधे दिली जातात त्या औषधाच्या अधिक डोसामुळे त्यांचे हृदय व फुफ्फुस हे दोन्ही अवयव खराब झालेली असल्याने त्यांना श्वास घेणे दिवसेंदिवस अवघड होत चाललेले आहे, त्यासाठी त्यावेळी पासून त्यांना ऑक्सीजन वर ठेवण्यात आलेले आहे आज पर्यंत मी माझ्या कुवतीनुसार लाखो रुपये खर्च करण्यात आलेले आहेत डॉक्टरच्या सल्ल्यानुसार त्यांचे हृदय आणि फुफुसाचे प्रत्यारोपण करण्याची आवश्यक आहे असे डॉक्टरने सांगितलेले आहे त्यासाठी त्यांना ५५ लाख रुपये खर्च आहे एवढा मोठा खर्च माझ्यासारख्या कुटुंबाला न परवडणारा असून यापूर्वी मी नऊ लाख रुपये खर्च करून त्यांची तब्येत बरी करण्यासाठी प्रयत्न केलेला आहे तो अपुरा पडतोय म्हणून मला तुमचे आशीर्वाद व आर्थिक मदतीची गरज आहे मानव ही जात आणि माणुसकी हा धर्म या न्यायाने आपण माझ्या पतीच्या आजारपणासाठी हृदय व फुफुस या अवयवाचे प्रत्यारोषण करण्यासाठी सहकार्य करा ही तुमच्या लेकीची बहिणीची कळकळीची विनंती आहे माझ्या कुटुंबाला व माझ्या मुलांना च्या पप्पांसाठी आणि माझ्या पतीचे प्राण वाचून आभाळएवढी माया कराल ही अपेक्षा.