संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या जनजागृती व शांतता रॅलीचे कापूरहोळ येथे जंगी स्वागत; दुधाई वीर धाराऊमाता गाडे पाटील यांच्या स्मारकाचे घेतले दर्शन
कापूरहोळ : मराठा आरक्षणासाठी लढा देत असलेले संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या वतीने राज्यव्यापी मराठा आरक्षण जनजागृती शांतता रॅली चे आयोजन करण्यात आले असून त्याचा दुसरा टप्पा पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर येथून ७ ऑगस्ट रोजी सुरू करण्यात आला. यानिमित्ताने राज्यातून मनोज जरांगे पाटील यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे. आज रविवारी(दि. ११ ऑगस्ट) साताऱ्यावरून निघालेली ही रॅली ठिकठिकाणी थांबत सकाळी साडे अकरा वाजता भोर तालुक्यातील कापूरहोळ येथे पोहोचली. येथील मुख्य चौकात या रॅलीचे जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी मनोज जारांगे पाटील यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या दुधाई म्हणून ओळख असलेल्या वीर धाराऊमाता गाडे पाटील यांच्या स्मारकाचे दर्शन घेतले. यावेळी भोर तालुक्यातील गावागावातून आलेले युवक, महिला, जेष्ठ नागरिक तसेच तालुक्यातील विविध पक्षाचे, संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी “एक मराठा लाख मराठा” या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला. यावेळी राजगड पोलीस ठाण्याच्या वतीने चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
यावेळी कापूरहोळ गावच्या सरपंच मंगल गाडे, उपसरपंच पंकज बाबी गाडे, शिवसेना नेते कुलदीप कोंडे, सकल मराठा समाज भोर तालुका अध्यक्ष संजय भेलके, वीर धाराऊ माता गाडे पाटील ट्रस्टचे अध्यक्ष अमित गाडे, युवराज जेधे, योगेश गाडे, सोमनाथ ढवळे, सारंग शेटे, संतोष मोहिते, महेश कोंडे, दीपक शेटे, गणेश धुमाळ, संदीप बांदल, विशाल खुटवड, गोरक्ष अहिरे, बाबुराजे गाडे, सचिन वीर, म्हस्कोबा गाडे, अनिल तनपुरे, सरिता गाडे, सिंधुबाई गाडे तसेच भोर तालुक्यातील नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.