भोर तालुक्यातील महाविजय संवाद मेळाव्यात डॉ. नीलम गोऱ्हे, बाळासाहेब चांदेरेंचा आमदार थोपटेंवर हल्लाबोल
सारोळे : मुळशीचे माजी सभापती व भोर शिवसेना जिल्हा प्रमुख बाळासाहेब चांदेरे यांनी शिवसेनेच्या वतीने रविवारी(दि. २९ सप्टेंबर) भोर आणि राजगड तालुक्यात जनसंवाद दौऱ्याचे अयोजन केले होते. यावेळी चांदेरे यांनी विविध विकास कामांचा शुभारंभ करत कापुरव्होळ(ता.भोर) येथील शिवसेना जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन केले. तसेच यादरम्यान धांगवडी(ता.भोर) येथे शिवसेनेच्या वतीने महाविजय संवाद मेळाव्याचे अयोजन करण्यात आले होते. यावेळी शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे उपस्थित होत्या.
मुळशीत आमदार थोपटेंना मुळशीत तीस हजार मतदान सुद्धा घेऊन देणार नाही
यावेळी बोलताना बाळासाहेब चांदेरे म्हणले की, भोर विधानसभेवर भगवा फडकवण्याचे आमचे धैय्य असून मुख्यमंत्र्यांनी आम्हाला संधी द्यावी. तसेच भोर विधानसभा मतदार संघात मुळशी तालुक्यातील मतदार संख्या सर्वात जास्त असून आम्ही आमदार संग्राम थोपटेंना मुळशीत तीस हजार मतदान सुद्धा घेऊन देणार नसल्याचे ते यावेळी म्हणाले.
“जो पर्यंत धनुष्यबाण तो पर्यंत बहीणींचा सन्मान”
यांनतर पुढे डॉ. नीलम गोऱ्हे बोलल्या की, लाडकी बहीण योजना बंद होणार असा प्रचार विरोधक करत आहेत, काँग्रेस अत्तापर्यंत अफवा पसरवूनच निवडुण आले आहे. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शासनाने जारी केलेल्या कोणत्याच योजना बंद होणार नसून “जो पर्यंत धनुष्यबाण तो पर्यंत बहीणींचा सन्मान” होत राहील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
डॉ. नीलम गोऱ्हे यांचा आमदार थोपटेंवर हल्लाबोल
पुढे बोलताना त्यांनी विद्यमान आमदार संग्राम थोपटेंवर टीकास्त्र डागले, त्या बोलल्या की, विद्यमान आमदारांनी खुप वेगवेगळ्या प्रकारे तुमची फसवणुक केली आहे. कारखाना बंद आहे, जमिनीची प्रकरणे चालु आहेत, याबरोबरच त्यांचा शेवटचा प्रयत्न होता कि, त्यांना अध्यक्षपदाची खुर्ची मिळावी परंतु मिळाली नाही. तसेच कोणीतरी त्यांची उमेदवारी जाहीर केली असे समजते, परंतु मतदान कोणी गहाण ठेवले नाही कि त्यांनाच मिळेल, येथील मतदान हे शिवसेनेच्या धनुष्यबाणावर आहे. या ठिकाणी विकास करणारा उमेदवार हवा आहे.
तुमच्या मनातला उमेदवार मुख्यमंत्री शिंदे जाहीर करणार
पुढे त्या म्हणाल्या की, मुख्यमंत्री शिंदे साहेब येथील उमेदवारी जाहीर करताना तुमच्या मनात जो उमेदवार आहे तोच जाहीर करतील अशी मला खात्री आहे. सर्व इच्छुकांनी एकत्र येऊन काम केल्यास विधानसभेवर नक्कीच भगवा फडकवेल असे बोलून त्यांनी यावेळी भोर विधानसभेतील तीन तालुक्यांसाठी तीस लाख रुपये निधी जाहीर केला.
या मेळाव्याप्रसंगी महिला जिल्हाप्रमुख कांताताई पांढरे, भोर विधानसभा प्रमुख गणेश मसुरकर, भोर तालुका प्रमुख दशरथ जाधव, मुळशी तालुका प्रमुख दीपक करंजावणे, महिला भोर तालुका प्रमुख उज्वला पांगारे, जिल्हा नियोजन समिती सदस्य अमोल पांगारे, कामगार सेना तालुका प्रमुख ओमकार तांदळे, युवासेना समन्वयक राजेंद्र पवार, उपतालुका प्रमुख केतन देवकर तसेच बहुसंख्येने पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.