भोर तालुक्यातील हातवे बु. येथून ३० वर्षीय युवक बेपत्ता
भोर : भोर तालुक्यातील हातवे बु. येथील कृष्णांत राजेंद्र पालखे (वय ३० वर्षे) हा युवक रविवारी (दि. ३१ डिसेंबर) रोजी सकाळी ११ वाजन्याच्या सुमारास हातवे बु. (ता. भोर जि.पुणे.) येथील राहत्या घरातून कोणास काहीही न सांगता निघून गेला आहे. त्यानंतर तो रात्री घरी येईल असे वाटले परंतु तो काही घरी आला नाही म्हणुन कृष्णांत चे वडील राजेंद्र लक्ष्मण पालखे (वय ५४ वर्षे) यांनी राजगड पोलिस स्टेशन कडे धाव घेतली. त्यांनी दुसऱ्या दिवशी सोमवारी (१ जानेवारी) रोजी कृष्णांत हरवल्याची तक्रार राजगड पोलीस स्टेशन येथे दाखल केली आहे.
कृष्णांत चे वर्णन पुढीलप्रमाणे
उंची पाच फुट दोन इंच, रंग सावळा, चेहरा उभट, नाक सरळ, केस बारीक काळे, अंगाने सडपातळ, अंगात पांढ-या रंगाचा फुल शर्ट, त्यावर निळे रंगाचे फुल जॅकेट, पायात निळे रंगाची जिन्स.
वरील वर्णनाचा युवक कोणाला दिसल्यास वा आढळून आल्यास राजगड पोलिसांशी संपर्क करावा असे आवाहन पोलीस अंमलदार कोंढाळकर यांनी केले आहे.