मनसे जिल्हाध्यक्ष संतोष दसवडकर यांच्या उपस्थितीत वेल्हे दापोडे रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यात वृक्षारोपण व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयाला टाळे

वेल्हे : वेल्हे तालुक्याच्या रस्त्यांच्या दुरावस्थे बाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून जिल्हाध्यक्ष संतोष दसवडकर यांच्या मार्गदर्शनाखाली चेलाडी ते वेल्हे रस्त्यावर दापोडे येथे आंदोलन करण्यात आले. येथील रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यात मनसेच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले व वेल्हेतील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयास टाळे ठोकण्यात आले. येत्या आठ दिवसात तालुक्यात येणारे सर्वच रस्ते व्यवस्थित झाले नाहीत तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून चेलाडी फाटा येथे रास्ता रोको करण्यात येणार असल्याचा इशारा मनसेकडून देण्यात आला याबाबतचे निवेदन सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालय वेल्हे येथे गेले असता कार्यालय बंदच होते.

Advertisement


वेल्हे तालुक्यात येणारे चेलाडी ते वेल्हे, खानापूर ते वेल्हे, कादवे ते वेल्हे, कुसगाव ते वेल्हे, हे मार्गातून या सर्व मार्गांची अतिशय दुरावस्था झाली असून ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असून रस्त्यामध्ये वाहतुकीत मोठा परिणाम झालेला दिसून येत आहे. अनेक ठिकाणी पावसाच्या पाण्यामुळे रस्ते वाहून गेलेले आहेत. तालुक्यामध्ये किल्ले राजगड, तोरणा, मढेघाट, गुंजवणी यासारखी पर्यटन स्थळे आहेत. त्यामुळे नियमित या रस्त्यावरून पर्यटकांची वर्दळ असते परंतु रस्ते खराब झाल्यामुळे वाहतुकीवर मोठा परिणाम होत आहे. खड्ड्यात रस्ते की रस्त्यात खड्डे हेच समजत नाही, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडुन जिल्हाध्यक्ष संतोष दसवडकर यांच्या मार्गदर्शनाखाली दापोडे या ठिकाणी पडलेल्या खड्ड्यात वृक्षारोपण करून आंदोलन करण्यात आले, तसेच रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू होते या ठिकाणी मनसेचे पदाधिकारी जाऊन हे काम बंद पाडले व दर्जेदार काम करण्याच्या सूचना दिल्या.


वेल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यालय कायमच बंद असते तर या ठिकाणी देखील एकही अधिकारी कर्मचारी उपस्थित नसतो, त्यामुळे या कार्यालयास मनसेकडून टाळे ठोकण्यात आले, यावेळी जिल्हाध्यक्ष संतोष दसवडकर तालुका अध्यक्ष दिगंबर चोरगे,अंकुश दसवडकर, संदीप दिघे, ज्ञानेश्वर भुरुक, दत्ता शेंडकर, विकास भिकुले, सुनील रेणुसे, विनायक लिम्हन, अमोल गायकवाड, चंद्रकांत चव्हाण,धनंजय रेणुसे, राजू झांजे, अमित दसवडकर,उपसरपंच दत्ता कदम आधीसह मनसे कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page