नसरापूर येथील श्री बनेश्वर मंदिरात त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त दिव्यांची आरास
नसरापूर : हिंदु धर्मात अनन्य साधारण महत्त्व असलेली कार्तिक पौर्णिमा आज आहे. आजच्या दिवशी अनेक ठिकाणी दिपोत्सव साजरा केला जातो. या दिवशी भगवान शंकराने अखंड भूमीवरील जनतेला त्रास देणाऱ्या त्रिपुर राक्षसाचे तीन पुत्रांचा वध केला म्हणून या पौर्णिमेला त्रिपुरी किंवा त्रिपुरारी पौर्णिमा असेही म्हणतात.
या पौर्णिमेनिमित्त नसरापूर येथील श्री बनेश्वर मंदिरात शिवलिंगाभोवती विविध रंगांच्या फुलांची नयनरम्य सजावट करून दिवे प्रज्वलित केले होते. मंदिरात लावलेल्या दिव्यांच्या प्रकाशाने एक वेगळेच वातावरण निर्माण झाले होते. विविधरंगी पणत्यांसह दिव्यांची आकर्षक आरास, नानाविध फुलांची सजावटिने उजळलेल्या श्री बनेश्वर मंदिराचे विलोभनीय दृश्य त्रिपुरारी पौर्णिमेला पाहायला मिळाले. अनेक भाविकांनी या पौर्णिमेनिमित्त शिवलिंगाचे दर्शन घेतले.