‘सुप्रसिद्ध बैलगाडाप्रेमी गोल्डमॅन’ पंढरीशेठ फडके यांचे निधन
निनाद महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : बैलगाडा प्रेमी गोल्डन मॅन पंढरीशेठ फडके यांचे दुपारच्या सुमारास हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने निधन झाले आहे. त्यांच्या ऑफिसवरून घरी जाताना कारमध्ये त्यांना हा हृदयविकाराचा झटका आला. पंढरीशेठ यांच्या निधनाने पनवेलच्या विहिगर येथील परिसरात शोकाकूल वातावरण आहे. पंढरीशेठ यांच्या जाण्याने बैलगाडा शर्यत प्रेमींना मोठा धक्का बसला आहे.
मुळचे पनवेलचे असलेले पंढरीशेठ फडके हे बैलगाडा शर्यत शौकिन म्हणून ओळखले जातात. पंढरीनाथ फडके हे आधी शेकाप पक्षात सक्रिय होते. त्यानंतर त्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. १९८६ सालापासून वडिलांमुळे फडकेंना बैलगाडा शर्यतीची आवड निर्माण झाली.
बैलगाडा शर्यतीच्या मैदानात त्यांच्या हटके एन्ट्रीची, सोन्याची आणि गाडीच्या टपावर बसून शर्यत बघण्याच्या निराळ्या स्टाईलची चांगलीच चर्चा असायची. बैल नजरेत बसला की कितीही पैसे लागू द्या, त्याला विकत घेणारा ‘बैल’मालक म्हणून पंढरीशेठ यांची ओळख होती.