अभिमानास्पद! नोएडा येथे झालेल्या राष्ट्रीय ज्यूदो स्पर्धेत शौर्या धाडवे स कांस्यपदक
पुणे : नोएडा येथे नुकत्याच झालेल्या CBSE राष्ट्रीय ज्यूदो स्पर्धेत आर्यन स्कूल(पुणे) ची विद्यार्थिनी तसेच मूळ गाव सारोळे (ता.भोर, जि.पुणे) कन्या शौर्या दयानंद धाडवे हिला कांस्यपदक मिळाले. नोएडा येथील मॉर्डन स्कूल मध्ये पार पडलेल्या स्पर्धेसाठी संपूर्ण भारतातून ७०० स्पर्धक तसेच दुबई आणि UAE च्या स्पर्धकांनी हजेरी लावली होती. शौर्या ने १४ वर्षा खालील ३५ किलो वजन गटात नाव्या गारग(पंजाब),हिमान्य सिंग (हरियाणा),यांना पराभूत केले तर लावण्या टोकस(दिल्ली) हिच्या बरोबर झालेल्या अटीतटीच्या सामन्यात तीला पराभव स्वीकारावा लागला, शौर्याने रितू सिंग(नोएडा)हीचा काही सेंकदातच इप्पोन शिवनागे या डावावर पराभव करून कांस्यपदक जिंकले.
आर्यन स्कूल चे संस्थापक मिलिंद लडगे ,प्रिन्सिपल जया चेतवानी आणि क्षितिज नाचनकर यांनी तीचे अभिनंदन व मार्गदर्शन केले. शौर्या ही क्रिस्टल ज्यूदो सेंटर येथे ईशान धाडवे,अथर्व चव्हाण, यज्ञवि सुतार,तेजप्रकाश मिराशी यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत आहे. भारतीय ज्यूदो संघाचे प्रशिक्षक योगेश धाडवे, महाराष्ट्र ज्यूदो संघटनेचे सेक्रेटरी शैलेश टिळक, टेक्निकल सेक्रेटरी दत्ता आफळे आणि क्रिस्टल क्लबचे अध्यक्ष श्रीपाद जगताप सर यांनी तिचे विशेष कौतुक केले.