आरक्षण मिळण्यासाठी धनगर समाजाचा खंडाळा मध्ये रास्ता रोको आंदोलन; आमदार गोपीचंद पडळकर यांचाही सामावेश
खंडाळा : अनुसूचित जमाती मध्ये आरक्षण मिळण्यासाठी धनगर समाजाच्या वतीने पुणे-सातारा राष्ट्रीय महामार्गावर खंडाळा येथे रास्ता रोको आंदोलन आज शुक्रवार (दि.१ डिसेंबर) दुपारी सुरू करण्यात आले आहे. आमदार गोपीचंद पडळकर यांनीही या आंदोलनात सहभाग घेतला आहे. या रास्ता रोको आंदोलनामुळे हायवे वरील ट्रॅफिक एका बाजूला खंडाळा ते शिरवळ पर्यंत व दुसऱ्या बाजूला खंडाळा ते खंबाटकी बोगदा इथपर्यंत जाम झाले आहे. यामुळे या आंदोलनाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या आंदोलनासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.