प्लॅस्टिक फुलावरील बंदीचा मुद्दा संसदेत मांडणार, खासदार सुप्रिया सुळे यांचे पुरंदर येथे प्रतिपादन
पुरंदर : पोंढे (ता. पुरंदर) येथे बाजारपेठेत प्लॅस्टिक फुलांच्या अतिवापरामुळे सामान्य फूल उत्पादक शेतकऱ्यांच्या पदरी काहीच येत नसल्याची व्यथा फूल उत्पादक शेतकऱ्यांनी मांडली. यामुळे सुळे यांनी प्लॅस्टिकच्या फुलांच्या बंदीसाठी पुढाकार घेणार असल्याचे शेतकऱ्यांना सांगितले. राजुरी पोंढे ते वाघले वस्ती या रस्ताचे भूमिपूजन व गावातील विविध विकासकामांचे उद्घाटन खासदार सुळे व आमदार संजय जगताप यांच्या हस्ते झाले. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला.
खासदार सुळे म्हणाल्या की, बाजारपेठेमध्ये चीनमधून येणाऱ्या प्लॅस्टिक फुलांवर अधिक मूल्य आकारण्याची मागणी करण्याबरोबरच संसदेत प्लास्टिक फुलावर बंदी आणण्याबाबतचा विषय मांडणार आहे. यामुळे काही जण नाराज होतील. मात्र माझ्या फूलउत्पादक उत्पादक शेतकऱ्यांसाठी हा विषय मी मांडणार आहे.
यावेळी विजय कोलते, सुदाम इंगळे, माणिक झेंडे, प्रदीप पोमण, गणेश जगताप, गौरी कुंजीर, सुनीता कोलते, शहाजान शेख, पुष्कराज जाधव, सरपंच छाया सोमनाथ वाघले, उपसरपंच दीपक गायकवाड, सदस्या नंदा वाघले, मंदा लोखंडे, पंकज लोखंडे, माजी सरपंच संपत वाघले, रामदास वाघले आदी उपस्थित होते.