भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६७ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त नामदार नरेंद्र पाटील यांच्याकडून भोर येथे अभिवादन
भोर : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६७ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अण्णासाहेब आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नामदार नरेंद्र पाटील यांच्याकडून भोर येथील बस स्टँड समोरील पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.
भारतरत्न भीमराव रामजी तथा बाबासाहेब आंबेडकर हे बहुआयामी व्यक्तिमत्वाचे स्वामी होते. न्यायशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, प्रखर समाज सुधारक असलेल्या बाबासाहेब आंबेडकर यांनी अश्पृश्यता, जाती व्यवस्था सारख्या सामाजिक कुप्रथांविरुद्ध आपल्या लेखणी व वक्तृत्वातून मोठी जन जागृती घडवून आणली. बाबासाहेब आंबेडकर हे भारताचे पहिले कायदा व न्यायमंत्री, भारतीय राज्यघटनेचे जनक आणि भारतीय प्रजासत्ताकाच्या शिल्पकारांपैकी एक होते. या महापरिनिर्वाण दिनानिमित्त भोर मध्ये अभिवादन करताना भोर तालुका भाजप युवा मोर्चा चे अध्यक्ष,भाबवडी गावचे सरपंच अमर बुदगुडे,सामाजिक कार्यकर्ते बाजीराव धोंडे,बाळासाहेब चिकने, सोमनाथ ढेबे, अण्णासाहेब पाटील माथाडी युनियन चे सरचिटणीस पोपटराव धोंडे उपस्थित होते.