लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सारोळ्यात मतदानास तरुणाईचा उत्स्फूर्त सहभाग
सारोळे : लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानास आज मंगळवारी(दि. ७ मे) सकाळी ७ वाजता सुरूवात झाली. या दरम्यान बारामती लोकसभा मतदार संघाच्या भोर तालुक्यातील पूर्व भागातील सारोळे गावातील तरुणाईने यंदाच्या लोकसभा निवडणुकीत अग्रक्रमाने सहभागी होत उत्स्फूर्त प्रतिसाद दाखवला. तसेच नवमतदारांनी मोठ्या संख्येने मतदानाचा हक्क बजावला. एका अर्थाने या निवडणुकीत तरुणाई केंद्रस्थानी राहिली. यावेळी तरुणाईची जास्त प्रमाणात लगबग दिसून येत होती. उन्हाचा तडाखा असतानाही तरुण मतदान केंद्रांवरील बुथवर मतदारांचे यादीत नाव आहे की नाही याची शहानिशा करून उमेदवाराचे चिन्ह समजावून सांगत होते. दरम्यान, भोर तालुक्यात दुपारी ३ वाजेपर्यंत ३८ टक्के मतदान झाले असून सारोळे गावात ४२ टक्के मतदान पार पडले होते. याप्रसंगी सारोळे गावातील तरुणांनी मतदानासाठी मोठ्या प्रमाणात उत्स्फूर्त प्रतिसाद दाखवला.