कालीपुत्र कालीचरण महाराज यांच्या हस्ते श्री क्षेत्र बनेश्र्वर मंदिरात महाभस्मारती व सहस्त्र जलधारा अभिषेक संपन्न
नसरापूर :श्री क्षेत्र बनेश्वर मंदिर नसरापुर (ता.भोर, जि.पुणे) या ठिकाणी आज सोमवार (दि.११ डिसेंबर) रोजी कालीपुत्र कालीचरण महाराज यांच्या हस्ते महाभस्मारती व महादेवाच्या पिंडीवर सहस्त्र जलधारा अभिषेक करण्यात आला.
श्री क्षेत्र बनेश्वर मंदिर ट्रस्टच्या अध्यक्षतेखाली श्री क्षेत्र बनेश्वर मंदिर येथे आयोध्या येथून श्रीराम जन्मभूमी ट्रस्ट यांच्यावतीने कलश आणला गेला होता. या कलशाची पूजा कालीचरण महाराज यांच्या हस्ते करण्यात आली. महाराष्ट्रातील प्रत्येक तालुक्यात ४ कलश श्रीराम जन्मभूमी ट्रस्ट च्या वतीने पाठवण्यात आले आहेत. १४ जानेवारी पर्यंत हे अभियान चालणार आहे. त्यात असणाऱ्या अक्षदा प्रत्येक गावात आणि प्रत्येक घरात पोहोचाव्यात हा या ट्रस्ट चा मुख्य उद्देश असल्याचे यावेळी सांगण्यात आले. यावेळी बहुसंख्येने भाविक उपस्थित होते.