नसरापूर येथे घरफोडी; दागिने आणि रोखीसह ३ लाख २३ हजारांचा ऐवज चोरी
नसरापूर : भोर तालुक्यातील नसरापूर येथील बनेश्वर पॅराडाईज सोसायटी येथे झालेल्या घरफोडीमध्ये चोरट्यांनी दागिने आणि रोखीसह ३ लाख २३ हजारांचा ऐवज लंपास केला आहे. या प्रकरणी राजगड पोलीस स्टेशन येथे अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अभिजीत धर्मपाल गायकवाड (वय ३९ वर्षे) यांनी याबाबत फिर्याद दाखल केली आहे. गायकवाड हे नसरापुर येथील बनेश्वर पॅराडाईज सोसायटी मधील सी वींग मध्ये तिसऱ्या मजल्यावर फ्लॅट नं ३०९ मध्ये राहतात. गायकवाड हे कुटुंबियांसह रविवारी (१० डिसेंबर) घराला कुलूप लावून बाहेर गावी गेले होते. रविवारी रात्री अज्ञात चोरट्यांनी दरवाजाचे कुलुप तोडून आत प्रवेश करुन एकूण २,२०,००० रुपये किंमतीचे सोन्या चांदीचे दागिने आणि १,०३,९५० रुपये रोख रक्कम असे एकूण ३,२३,९५० रुपये किंमतीचा ऐवज चोरी झाल्याची तक्रार अभिजीत गायकवाड यांनी राजगड पोलीस स्टेशन येथे आज सोमवार (११डिसेंबर) रोजी नोंदवली आहे. सदर घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संजय सुतनासे करीत आहेत.