पाचगणी मधील रिसॉर्टवर ‘छमछम’; रिसॉर्ट चालकसह, सहा डॉक्टर, फार्मासिस्टला अटक, एकूण नऊ जण ताब्यात

महाबळेश्वर: कासवंड (ता. महाबळेश्वर) येथील स्प्रिंग रिसॉर्टवर ‘छमछम’ सुरू असतानाच पोलिसांनी छापा टाकून चार युवतींसह सातारा जिल्ह्यातील पाच डॉक्टर, मिरजमधील एक व पुण्याचे फार्मासिस्ट आणि रिसॉर्ट चालक व वेटर असे एकूण नऊ जणांना ताब्यात घेतले आहे. या घटनेमुळे सातारा जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

याप्रकरणी डॉ. मनोज विलास सावंत (वय ४० वर्षे, रा. जयवंत नगर, दहिवडी), डॉ. राहुल बबनराव वाघमोडे (वय ३१ वर्षे, रा. गोंदवले, ता. माण), डॉ. निलेश नारायण सन्मुख (वय ३९ वर्षे, रा. मिरज), डॉ. रणजीत तात्यासाहेब काळे (वय ४३ वर्षे, बाजार पटांगण रा. दहिवडी), डॉ. महेश बाजीराव साळुंखे (वय ४० वर्षे, रा. मलकापूर, कराड), डॉ.हनुमंत मधुकर खाडे (वय ६५ वर्षे, रा. दहिवडी), डॉ. प्रवीण शांताराम सौद (वय ४० वर्षे, रा. माळुंगे पाडळे,मुळशी पुणे, फार्मासिस्ट),रिसॉर्ट चालक विशाल सुरेश शिर्के(वय ३६ वर्षे रा.वाई) आणि कृष्णा दयावंत प्रशादकोल (वय ३१ वर्षे, व्यवसाय वेटर रा. स्प्रिंग व्हॅली रिसॉर्ट कासवंड) आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, थंड हवेचे ठिकाण असलेल्या पाचगणी कासवंड गावातील स्प्रिंग रिसॉर्टमधील एका हॉलमध्ये सांगली-पुण्यातून चार नर्तिका आणण्यात आल्या असून, त्या गिऱ्हाईकांसमोर तोकड्या कपड्यात बीभत्स अंगविक्षेप करत नाचत असल्याची माहिती साताऱ्याच्या अतिरिक्त पोलीस अधीक्षक ऑंचल दलाल यांना मिळाली. या माहितीवरून साताऱ्यावरून विशेष पथक पाचगणी कासवंड येथे रवाना करण्यात आले.

Advertisement

घटनास्थळावर पोहोचताच रात्री साडेनऊच्या सुमारास पाचगणी कासवंड येथील स्प्रिंग रिसॉर्टच्या तळमजल्यावर सातारा जिल्ह्यातील पाच डॉक्टर व मिरज व पुण्यातील एक असे सात जण दारूच्या नशेत नर्तिकांच्या समोर मद्य पिऊन झिंगत असतानाच पोलिसांना रंगेहात सापडले. पोलिसांनी कारवाई करत, सहा डॉक्टर व एक फार्मासिस्ट, रिसॉर्ट चालक व वेटर अशा एकूण नऊ जणांच्या विरोधात कारवाई केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page