आंळदी म्हातोबाची (हवेली) येथे शेतकरी प्रशिक्षण वर्ग संपन्न; मोठ्या संखेने महिला शेतकरींचा सहभाग

हवेली : महाराष्ट्र शासन कृषि विभाग, कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा,आत्मा पुणे व महात्मा फुले कृषि विद्यापीठ राहुरी यांच्या संयुक्त विद्यमानाने पिक विविधीकरण प्रकल्प अंतर्गत शेतकरी प्रशिक्षण वर्ग आंळदी म्हातोबाची (ता. हवेली, जि. पुणे) येथे आयोजित करण्यात आला होता.

महाराष्ट्र शासनाच्या सेंद्रिय शेतीस चालना देण्यासाठी  डाॅ.प्रशांतकुमार पाटील (कुलगुरु , महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी), डाॅ. सी.एस. पाटील (संचालक,कृषि विस्तार शिक्षण), डाॅ.एस.डी.गोरंटीवार (संचालक, कृषि संशोधन), डाॅ.एस‌.ए.रणपिसे (अधिष्ठाता, महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी), संजय काचोळे (जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी,पुणे), विजय हिरेमठ (प्रकल्प संचालक, आत्मा, पुणे), सुरज मडके (उपविभागीय कृषि अधिकारी, पुणे), मारुती साळे (तालुका कृषि अधिकारी, हवेली) यांच्या मार्गदर्शनाखाली व मंडळ कृषि हडपसर यांच्या वतीने आयोजित डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन अंतर्गत सेंद्रिय शेती शेतकरी गट प्रशिक्षण, किसान गोष्टी कार्यक्रम, एकात्मिक शेती विकास प्रकल्प, कांदा पिक परिसंवाद या कार्यक्रमामध्ये सर्वांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.

डाॅ.उल्हास सुर्वे (नोडल अधिकारी, सेंद्रिय शेती प्रकल्प, महात्मा फुले कृषि विद्यापीठ,राहुरी) यांनी एकात्मिक शेती विकास प्रकल्प, सेंद्रिय शेती काळाची गरज, सेंद्रिय शेतीची मुलभुत तत्वे,सेंद्रिय कर्ब , जमीनीचे आरोग्य ते पिक उत्पादन, प्रक्रिया, प्रमाणीकरण व विक्री बाबत सविस्तर मार्गदर्शन केले.

डाॅ.आदिनाथ ताटके (मृदा शास्त्रज्ञ) यांनी कांदा पिकाचे लागवड व उत्पादन तंत्रज्ञान, फळबाग लागवड तंत्रज्ञान तसेच आंबा मोहोर संरक्षण, सेंद्रिय शेतीमधील अन्नद्रव्य व्यवस्थापनबाबत माहीती दिली. डाॅ.सुनिल उगले (कृषि विद्यावेता , शास्त्रज्ञ) यांनी पिक पद्धती  बाबत मार्गदर्शन केले. मारुती साळे (तालुका कृषि अधिकारी, हवेली) यांनी कृषि विभागाच्या विविध योजना बाबत मार्गदर्शन केले.

Advertisement

बाळासाहेब सोळंकुरे पाटील (व्यवस्थापकीय संचालक भुदरगड नॅचरल शेतकरी उत्पादक कंपनी) यांनी शेतकरी गट व शेतकरी उत्पादक कंपनी ची स्थापना करण्यासाठी सखोल मार्गदर्शन केले, त्यामध्ये शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करतेवेळी शेतकऱ्यांनी महाराष्ट्र सरकार विकास महामंडळ पुणे (महाराष्ट्र शासन अंगीकृत)CAS कडे करून घ्यावे, शेतकरी ते ग्राहक विक्री व्यवस्था, आठवडी बाजार, देशपातळीवर तसेच विदेशातील शेतमाल विक्री व्यवस्थापन बाबत सविस्तर माहिती यावेळेस त्यांनी दिली.

गुलाबराव कडलग (मंडळ कृषि अधिकारी, हडपसर) यांनी उच्च तंत्रज्ञानावर आधारित संरक्षित शेती बाबत मार्गदर्शन केले. मेघराज वाळुंजकर (कृषि पर्यवेक्षक हडपसर-१) यांनी सेंद्रिय शेती प्रकल्प संकल्पना, सेंद्रिय शेतकरी गट प्रशिक्षण,शेतकरी गट व शेतकरी उत्पादक कंपनी,सेंद्रिय निविष्ठा निर्मिती व पिक उत्पादनातील वापर बाबत मार्गदर्शन केले. रामदास डावखर (कृषि पर्यवेक्षक हडपसर-२), यांनी महाडीबीटी प्रणाली अंतर्गत ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत व विविध योजनांच्या अनुदानाची वितरण पद्धती बाबत माहिती दिली. सौरभ जाधव (कृषि सहाय्यक, आळंदी म्हातोबाची) व  रेश्मा शिंदे (सहाय्यक तंत्रज्ञान अधिकारी, आंळदी म्हतोबाची) यांनी सेंद्रिय शेती शेतकरी गट प्रशिक्षण व किसान गोष्टी कार्यक्रम चे उत्कृष्ट नियोजन केले. तसेच या कार्यक्रमास गावातील महिला बचत गटातील महिला शेतकरी ही मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नागेश मेहेत्रे, शंकर चव्हाण, राजेंद्र भोसेकर, पुष्पा जाधव, ज्योती हिरवे, कृषि सहाय्यक यांनी सदर कार्यक्रमाच्या आयोजनात सहभाग नोंदवून शेतकऱ्यांना सहभागी करुन घेतले. सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष रामदास पोपट जवळकर (माजी चेअरमन, विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी) यांनी कृषि विद्यापीठ व कृषि विभागाच्या कामाची प्रशंसा केली तसेच लक्ष्मण भोंडवे (तंटामुक्ती अध्यक्ष) यांनी उपस्थितांचे आभार मानले .सदर प्रशिक्षण वर्गास प्रगतशील शेतकरी शिवाजी खंडेराव जवळकर, विलास जवळकर, गणेश कुंजीर, विजय सुरेश जवळकर, कैलास भोंडवे, बाळासाहेब भोंडवे, तिखे काका, माऊली भाथेफोड, लक्ष्मण खटाटे व इतर सर्व शेतकरी व महिला शेतकरी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शेतकरी प्रशिक्षण वर्गानंतर विजय सुरेश जवळकर यांच्या सेंद्रिय आंबा बागेत क्षेत्रीय भेटीचे आयोजन करण्यात आले होते व तेथे सेंद्रिय निविष्ठा निर्मिती ची प्रात्यक्षिके करण्यात आली व पिक उत्पादन मधील वापराबाबत कृषि शास्त्रज्ञांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page