भोर येथील पांगारी येथे बिबट्यांचा शेळ्यांवर हल्ला…
एक शेळी जखमी तर उर्वरित शेळ्या बेपत्ता…
कापूरहोळ प्रतिनिधी : मंगेश पवार
भोर न्यूज : भोर तालुक्यातील भाटघर जलाशयाच्या पांगारी येथील नानावळे येथे सोमवारी (दि.९) सायंकाळी सहा च्या दरम्यान बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी रामचंद्र धोंडीबा शिंदे यांच्या एका शेळीचा मृत्यू झाला आहे, आणि बापू शिंदे यांच्या पाच शेळ्या बेपत्ता असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
दोन्ही शेतकऱ्यांनी आपल्या २५ शेळ्या गावातील राजदरा येथे चारण्यासाठी नेल्या होत्या त्याच संध्याकाळच्या वेळेस शेळ्या एकत्र न आल्याने शेतकऱ्यांनी शेतामध्ये जाऊन शोधण्याचा प्रयत्न केला. शेळ्या शोधत असताना जखमी अवस्थेतील एक शेळी मृत अवस्थेत सापडली. बापू शिंदे यांनी ती मृत शेळी बाजूला करत असताना समोरून बिबट्या येत असल्याने पाहताच ते भीतीने पळून गेले. त्यामधील एकूण शेळ्यांपैकी बापू शिंदे यांच्या पाच शेळ्या बेपत्ता आहेत. संध्याकाळी अंधार पडल्यानंतर त्यांचा शोध घेता आला नाही. या घटनेची बातमी वनविभागाला फोन द्वारे कळविले असल्याचे सरपंच विठ्ठल शिंदे यांनी सांगितले. वन विभागाने नागरिकांना रात्रीचे घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे.