भारतीय सैन्यात मुस्लीम रेजिमेंट का नाही? जाणून घ्या या प्रश्नामागचे उत्तर
निनाद महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : भारतीय सैन्यात मुस्लीम रेजिमेंट का नाही, अनेकांना हा प्रश्न पडतो. मग या प्रश्नाआड काहीजण एक दावा समोर करतात, भारतीय सैन्यात मुस्लीम रेजिंमेंट होती पण त्यांनी १९६५ च्या युद्धात पाकिस्तानविरोधात लढण्यास नकार दिला होता म्हणून ही रेजिमेंट बरखास्त करण्यात आली. हा दावा कितपत खरा की खोटा? हे जाणून घेऊया. तर विषय हा आहे की भारतीय सैन्यात मुस्लीम रेजिमेंट का नाही, प्रश्न प्रामाणिक आहे. या प्रश्नाचं उत्तर शोधणं देखील तितकच महत्वाचं आहे.
प्रश्नाच्या उत्तरासाठी आपणाला सर्वात पहिला रेजिमेंट हा काय प्रकार असतो याची माहिती करुन घ्यावी लागेल..?
रेजिमेंट हा शब्द बनला आहे तो रेजिमेन पासून या लॅटिन भाषेतील रेजिमेन शब्दाचा अर्थ नियमांची एक व्यवस्था. रेजिमेंट सिस्टिम सर्वात पहिल्यांदा इंफन्ट्री अर्थात भूदलात पहिल्यांदा आली.
रेजिमेंट व्यवस्थेत सैन्यातील अशी तुकडी धरण्यात आला ज्यांचा स्वत:चा एक इतिहास असेल. स्वतंत्र्य घोषणा, झेंडा, वर्दी आणि सिस्टीम असेल. या रेजिमेंट अंडर वेगवेगळ्या बटालियन असतात म्हणजे मराठा रेजिंमेंटची दोन नंबरची बटालियन म्हणजे २ मराठा असा वर्णन करण्यात येतं.
आत्ता मुख्य मुद्दा भारतीय सैन्यात अशा रेजिमेंट कधी पासून सुरू करण्यात आल्या.
याची सुरवात इंग्रजांनी केली. त्यांच्या थेअरीनुसार काही जातींना त्यांनी मार्शल रेस अस संबोधायला सुरवात केली. या मार्शल रेसचा आधार घेवून त्यांना इतरांपेक्षा अधिक लढवय्ये संबोधलं जावू लागलं व त्याच आधारे वेगवेगळ्या रेजिंमेंट तयार होत गेल्या. यातील काही रेजिमेंट इंग्रजांनी स्वत: तयार केल्या तर काही इतर राज्यांच्या पराभव केल्यानंतर त्या राज्याच्या रेजिमेंट सैन्यात दाखल करुन घेण्यात आल्या.
आत्ता मुळ प्रश्नाकडे येऊया. त्या वेळच्या सैन्यात मुस्लीम सैनिक होते का? तर तत्कालीन सैन्यात पठान, कुरैशी, मुस्लीम जाट बलौच असे सैनिक असायचे. साधारणं मुस्लीम लोकांच प्रमाण बंगाल प्रांत, सिंध प्रांत (आत्ताचा पाकीस्तान) अशा भागातून असायचे.
त्यानंतरची प्रमुख घटना म्हणजे १८५७ चा उठाव
१८५७ चा उठाव प्रामुख्याने उत्तर भारतात झाला. त्यातही बंगाल आर्मीचे सैनिक यात पुढे होते. त्यामुळे पुढे उठावात पुढे असणाऱ्या जाती व ज्या भागात उठाव झाला तिथल्या लोकांना सैन्यात भरती करून घेण्याचे थांबवण्यात आले. यामध्ये मुस्लीम आणि ब्राह्मण दोन्ही होते. यामुळे मुस्लीम रेजिमेंट कधी अस्तित्वातच येऊ शकली नाही.
त्यानंतरच्या काही काळानंतर भारताच्या उत्तर पश्चिम भागातून मुस्लीम सैन्यात दाखल करुन घेण्यात येऊ लागले. यामध्ये पठाण, मुस्लीम जाट, बलोच याचं प्रमाण होतं. हे सैनिक प्रामुख्याने आजच्या पाकीस्तान भागातून होते.
भारताला स्वातंत्र मिळाल्यानंतर काय झालं…?
अस सांगतात की भारताला स्वातंत्र मिळालं तेव्हा ब्रिटीश इंडियन आर्मीमध्ये साधारण ३० टक्के मुस्लीम सैनिक होते. फाळणी झाल्यानंतर इंडियन आर्मी आणि पाकिस्तान आर्मी अशा दोन भागात आर्मी विभागली गेली.
१८५७ नंतर ब्रिटीशांनी सध्याच्या पाकीस्तान भागातूनच मुस्लीम सैनिक भरती करून घेण्यावर जोर दिला असल्याने बरेच मुस्लीम लोक हे पाकीस्तानधूनच येत असत. साहजिक बरेच मुस्लीम सैनिक पाकिस्तान आर्मीमध्ये गेले.
आत्ता आज कोणकोणत्या बटालियन आहेत आणि तुमचं ग्रहितक कस मोडून निघू शकतं.. परमवीर चक्र विजेते कॅप्टन मनोज पांडे माहित आहेत का. ते कारगील युद्धात शहीत झाले होते. सांगण्याची गोष्ट म्हणजे ते गोरखा नव्हते. मात्र ते ११ गोरखा रायफल्सचे ऑफिसर होते.
दूसरी गोष्ट लेफ्टनंट कर्नल विरेंदर सिंह यांची ते जाट होते. मात्र संपूर्ण आयुष्यभर त्यांनी सिख रेजिमेंटचे नेतृत्व केले.
थोडक्यात काय तर मराठा रेजिमेंट, सिख रेजिमेंट, गोरखा रेजिमेंट अशी व्यवस्था असली तरी आज या रेजिमेंटमध्ये ब्रिटीशांप्रमाणे फक्त मराठा, फक्त सिख अशी सिस्टिम नसते. सैन्यात एक वाक्य फेमस आहे, “An Officer has got the religion of his troops” म्हणजेच ऑफिसरचा कोणताही धर्म नसतो. त्याच्या सैनिकांचा जो धर्म तोच त्याचा धर्म.
साहजिक मार्शल रेस ही कन्सेप्टचं भारतीय सैन्यात नाही. तरिही रेजिमेंट प्रकार का? तर इतिहास असेल तर सैनिकांना लढण्यास प्रोत्साहन मिळतं. प्रत्येक रेजिमेंट आपण कोणत्यातरी इतिहासाचे घटक आहोत अस सिद्ध करुन दाखवत असते.
राहता राहिला प्रश्न सैन्यात मुस्लीम किती आहेत हे विचारण्याचा, तर यावर आर्मीचे ऑफिसर म्हणतात, सैन्यात कधीही जाती, धर्म यांवर आधारीत संख्या मोजली जात नाही. जे लोक भारतासाठी लढतात त्यांना जात व धर्म विचारण्यात येऊन त्यांच्या मनाला काय वाटेल याचा विचार करावा. यामुळे सैन्यात कधीही धर्माच्या आधारावर मोजणी करण्यात आली नसल्याने निश्चित आकडेवारी नाही.
भारतात कुठलीही मुस्लीम रेजिमेंट नाही, पण आपल्या सैन्यात मुस्लीम जवान देखील आहेत. जे तेवढ्याच आत्मीयतेने आणि शुरतेने आपल्या देशाचे रक्षण करतात जसे इतर कुठल्याही रेजिमेंटचे जवान करतात.