हिवरे शाळकरी मुलाचे खून प्रकरण! कॅन्सर झाल्याच्या गैरसमजुतीतून बापानेच केला पोटच्या मुलाचा खून; तपासात धक्कादायक प्रकार उघड

सातारा (प्रतिनिधी) : कॅन्सर झाल्याची भीती मनात बसल्याने वडिलांनी बारा वर्षीय मुलाचा गळा आवळून खून केल्याची घटना पोलीस तपासात उघडकीस आली आहे. वाठार पोलीस व स्थानिक गुन्हे शाखा यांच्या संयुक्त तपासात खुनाचे धागेदोरे उलगडले. या प्रकरणी विजय खताळ यांना अटक करण्यात आली असून त्यांना दि. २९ डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

हिवरे (ता. कोरेगाव) येथे कुंभारकी नावाच्या शिवारात विक्रम उर्फ प्रणव विजय खताळ या अल्पवयीन मुलाचा अज्ञात इसमाने गळा आवळून खून केला होता. याबाबत वाठार पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्या निर्देशाप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे अरुण देवकर, सहायक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र शेळके, यांच्या पथकाने वाठार पोलीस स्टेशनबरोबर समांतर तपास सुरू केला.

पथकाने मृत मुलाच्या खुनासंदर्भात तपशिलामध्ये माहिती घेतली. तसेच जवळपासच्या साक्षीदारांकडे कसून चौकशी करण्यात आली. सदरचा गुन्हा हा त्याच्या वडिलांनी केल्या असल्याबाबतचा संशय निर्माण झाला होता. मुलाच्या वडिलांनी दिलेली माहिती आणि साक्षीदारांनी दिलेली माहिती यामध्ये तफावत आढळून येत होती त्यानुसार हा खून विजय खताळ यांनीच केल्याचा संशय बळकट झाला होता. खताळ यांना अधिक विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्यांनीच हा खून केल्याची धक्कादायक कबुली दिली.

Advertisement

खताळ यांना मानसिक दृष्ट्या आपल्याला कॅन्सर झालेला आहे, अशी भीती सातावत होती. तोच त्रास आपल्या मुलाला असल्यास व आपल्या पश्चात त्याचे पुढे कसे होईल या काळजीतूनच त्यांनी कुंभारकी शिवारामध्ये त्याचा गळा आवळून खून केला. वाठार पोलिसांनी खताळ याला अटक केली आहे.

सदर कारवाई मध्ये स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरूण देवकर, स.पो.नि. सुधीर पाटील, रविंद्र भोरे, वाठार पोलीस ठाणेचे सपोनि शिवाजी भोसले, पोलीस उप निरीक्षक, पतंग पाटील, विश्वास शिंगाडे, अमित पाटील, वाटार पोलीस ठाणेचे पोउनि संदीप बनकर, पोलीस अंमलदार सुधिर बनकर, संतोष सपकाळ, मंगेश महाडीक, शरद बेवले, सचिन साळुंखे, लैलेश फडतरे, लक्ष्मण जगधने, साबीर मुल्ला, प्रविण फडतरे, राकेश खांडके, अमोल माने, अजित कर्प, सनी आवटे, शिवाजी भिसे, स्वप्निल कुंभार, मनोज जाधव, अमित माने, अविनाश चव्हाण, गणेश कापरे, ओमकार यादव, स्वप्निल दाँड, केतन शिंदे, रोहित निकम, पृथ्वीराज जाधव, वैभव सावंत, अमृत कर्पे, विजय निकम, संभाजी साळुंखे, सायबर विभागाचे अमित झेंडे, अजय जाधव, वाठार पोलीस ठाणेचे पोलीस अंमलदार नितीन भोसले, उदय जाधव, प्रशांत गोरे, गणेश इथापे, प्रतिक देशमुख यांनी सहभाग घेतला असून कारवाईत सहभागी अधिकारी व अंमलदार यांचे श्री. समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा व श्रीमती आँचल दलाल अपर पोलीस अधीक्षक सातारा यांनी अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page