भोर-महाड मार्गावर शहरालगत सापडला ३५-४० वर्षीय अनोळखी व्यक्तीचा मृतदेह
भोर : भोर-महाड मार्गावर भोर शहरापासून थोडयाच अंतरावर असणाऱ्या मांगिरवाडीच्या अलीकडे महाड बाजूकडे जाताना रस्त्याच्या डाव्या साईडला वडाच्या झाडाखाली एका अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळला असून भोर मधील स्थानिक रहिवाशी अमोल बागडे यांनी याबाबत भोर पोलिसांना खबर दिली आहे.
या व्यक्तीचे वय अंदाजे ३५ ते ४० वर्ष असून अंदाजे साडे पाच फूट उंची, रंग काळा सावळा, कुरळे केस, पुढील बाजूस टक्कल आहे. तसेच अंगात मळकटलेली निळसर रंगाची पॅन्ट, राखाडी रंगाचा शर्ट त्यावर पिवळसर रंगाची पट्टी असलेला गोल गळ्याचा टी-शर्ट असून हातात रबरी बँडसह चांदीच्या रंगाचे कडे आढळून आले आहे. भोर व आजू बाजूच्या परिसरात या वर्णनाची कोणती व्यक्ती बेपत्ता असल्यास भोर पोलिसांना कळविण्याचे आवाहन पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत जाधव यांनी केले आहे.