वेल्हा व मुळशी तालुक्यातील १४ शाळांचे समूह शाळेसाठी प्रस्ताव

पुणे : पुणे जिल्ह्यातील वेल्हा व मुळशी तालुक्यातील १४ शाळांचे प्रस्ताव समूह शाळेसाठी प्राप्त झाले आहेत. या प्रस्तावांची तपासणी करून व उपयुक्तता विचारात घेऊन पुढील कार्यवाही केली जाणार आहे.

समूह शाळेत सहभागी होण्यास तयार असणाऱ्या शाळांच्या व्यवस्थापन समितीसह सर्व घटकांशी चर्चा करून व मान्यता घेऊन शासनाने प्रसिध्द केलेल्या नियमावलीनुसार पुणे जिल्ह्यात आणखी काही समूह शाळा निर्माण होण्याची शक्यता आहे.

पुणे जिल्ह्यातील पानशेत येथील समूह शाळेच्या धर्त्तीवर राज्यभरातून समूह शाळा सुरू करण्याचे प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. राज्यातील काही जिल्ह्यांमधून शिक्षण विभागाकडे समूह शाळेसाठीचे प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. जिल्ह्यातील केवळ भोर व मुळाशी तालुका गट शिक्षण अधिकाऱ्यांकडून समूह शाळांचे प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. संबंधित प्रस्तावित समूह शाळांची यादी शिक्षण विभागाकडे सादर करण्यात आली आहे.

Advertisement

त्यात वेल्हा तालुक्यातील विंझर, गुंजावणे, मांगदरी, वांगणवाडी, बोरावळे आणि अंबवणे या शाळांचा समावेश आहे. मुळशी तालुक्यातील उरवडे, आंदगाव, माले, तम्हिणी, निवे, वांद्रे, आंबावणे, भांबर्डे या समूह शाळा म्हणून प्रस्तावित आहेत. यातील शाळांमध्ये ६० ते ४०० विद्यार्थी सामावून घेण्याची क्षमता आहे.

शिक्षण विभागाकडे प्राप्त झालेल्या प्रस्तावित समूह शाळांमध्ये दोन्ही तालुक्यातील एकूण ७३ शाळांना सामावून घेता येऊ शकते. प्रस्तावित समूह शाळांमध्ये भौतिक सुविधा उपलब्ध आहेत. विद्यार्थ्यांना शाळेत आणण्यासाठी वाहतुकीवर मोठा खर्च होणार नाही, असेही या प्रस्तावात दिसून येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page