भोर पंचायत समिती मध्ये उद्योजकता विकास मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन

भोर : भोर पंचायत समिती येथे गुरुवारी (दि. ४ जानेवारी) ११ वाजता उद्योजकता विकास मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याला मार्गदर्शन करण्यासाठी जिल्हा कृषी अधिकारी डी आर पी माननीय पी टी काळे हे ही उपस्थित होते. भोर पंचायत समिती सभागृहामध्ये चालू उद्योग व्यवसायामध्ये वृद्धी करणे, नवीन उद्योजक घडविणे, केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री सूक्ष्म अण्ण प्रक्रिया उद्योग व राज्यशासनाच्या विविध सबसिडी च्या योजना, प्रकल्प उभारणी, बचत गटाच्या माध्यमातून उद्योग उभा करणे, या संदर्भामध्ये भोर तालुक्यातील विविध गावचे सरपंच, वेगवेगळे व्यवसाय करणारे उद्योजक, सुशिक्षित बेरोजगार तरुण यांच्या एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन भाबवडी गावचे सरपंच अमर बुदगुडे व म्हाळवडी गावचे सरपंच दत्तात्रय बोडके यांच्यामार्फत करण्यात आले होते.

Advertisement

यावेळी वयक्तिक लाभाच्या १ लाख ते ३० लाख रुपये किमतीचे प्रकल्प, सहकारी संस्थेच्या माध्यमातून १० कोटी रुपयांचे ३५% सबसिडी चे प्रकल्प यासंदर्भात मोलाचे मार्गदर्शन जिल्हा कृषी अधिकारी डी आर पी माननीय पी टी काळे यांनी केले. यावेळी प्राध्यापक बी डी गायकवाड, भोलावडे गावचे सरपंच प्रवीण जगदाळे, सरपंच अश्विनी खोपडे, अविनाश आवाळे, भोर शहर अध्यक्ष सचिन कण्हेरकर, उपाध्यक्ष समीर घोडेकर, रोहन भोसले, उद्योजक राजेश बोडके, सचिन म्हस्के, उद्योजक काळे व अनेक गावचे सरपंच, उपसरपंच, लहान मोठे उद्योजक मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार सरपंच अमर बुदगुडे यांनी मानले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page