पुणे-सातारा महामार्गावरील वरवे खुर्द गावच्या हद्दीत अज्ञात वाहनाच्या धडकेत आळंदेवाडीतील पुरुषाचा मृत्यू
नसरापूर : पुणे-सातारा महामार्गावर वरवे खुर्द (ता.भोर) गावच्या हद्दीत साताऱ्याच्या दिशेने मोटरसायकल वरून जात असताना सतीश पांडुरंग शिर्के (वय ४५ वर्षे, रा.आळंदेवाडी ता. भोर) या पुरुषाचा अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत मृत्यू झाला आहे.
या बाबत राजगड पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी (२१ जानेवारी) रात्री १०:१५ च्या सुमारास पुणे-सातारा महामार्गावर वरवे खुर्द (ता.भोर) गावच्या हद्दीतील शाळेसमोर पुणे बाजू कडून सातारा बाजू कडे जात असताना मोटार सायकल (एम.एच.१२.टी.टी.९३५२) वरील चालक सतीश शिर्के यांस अज्ञात वाहनावरील अज्ञात चालकाने दिलेल्या धडकेत त्यांचा मृत्यू झाला आहे. सदर मृत्यूस अज्ञात वाहन चालक जबाबदार असल्याची राजगड पोलीस स्टेशन येथे नथुराम दिनकर शिर्के (वय ६८ वर्षे, रा.आळंदेवाडी ता.भोर) यांनी फिर्याद दिली आहे. सदर घटनेचा पुढील तपास पोलीस अंमलदार गायकवाड करीत आहेत.