पुणे-सातारा महामार्गावर राजगड कारखाण्यासमोर ट्रक आणि रिक्षाच्या अपघातात रिक्षाचालक जागीच ठार

कापूरहोळ : पुणे-सातारा महामार्गावर राजगड साखर कारखाण्यासमोर निगडे (ता.भोर, जि.पुणे) गावच्या हद्दीत कोल्हापूर कडे जात असणाऱ्या ट्रकला मागून रिक्षाने दिलेल्या धडकेत रिक्षा चालक जागीच ठार झाला आहे.

Advertisement

गुरुवारी (दि. ४ जानेवारी) दुपारी ३ च्या सुमारास ट्रकचालक राजकुमार गोरख बनसोडे (वय ४६ वर्षे, रा.उसगाव ता.करवीर जि.कोल्हापुर) हे त्यांच्या ताब्यातील माती असलेला ट्रक (एम एन ०९ जी जे ६८५५) कंळबोली ते कोल्हापुर असा प्रवास करत असताना पुणे सातारा महामार्गावर राजगड साखर कारखाण्यासमोर निगडे (ता.भोर, जि.पुणे) गावच्या हद्दीत  त्यांच्या ट्रकला मागून रिक्षाने (एम एच ०३ बी टी ७७३८) धडक दिली असता त्यामध्ये रिक्षाचालक विश्वास पांडुरंग पवार (वय ६८ वर्षे, रा. स्वदेशी मिल, दगडु पवार चाळ, तांडवाडी चुनाभटटी ईस्ट सायन मुंबई) यांचा जागीच मृत्यू झाला. सदर घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलिस व राजगड पोलीस घटना स्थळी दाखल झाले व त्यांनी रिक्षाचालकाचा मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी भोर येथील उपविभागीय रुग्णालयात पाठविला असून अपघातग्रस्त वाहने बाजूला केली. याबाबत राजगड पोलीस स्टेशन येथे अपघाताची नोंद झाली असून पुढील तपास पोलीस अंमलदार दिनेश गुंडगे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page