खासदार सुप्रियाताई सुळे यांचा उद्या भोर दौरा
भोर : बारामती लोकसभा मतदार संघाच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रियाताई सुळे या उद्या शुक्रवार (दि. ५ जानेवारी) रोजी भोर तालुका दौरा करणार असून या दरम्यान त्या विविध ठिकाणी भेट देणार असून, काही मान्यवरांच्या भेटी घेणार आहेत. विद्या प्रतिष्ठान, भोर यांनी आयोजित केलेल्या शाळेत सायकल वाटप कार्यक्रमास सुप्रियाताई सकाळी ९:३० वाजता उपस्थित राहणार असून, त्यानंतर ११ वाजता भोर शहरातील व्यापाऱ्यांसोबत होणाऱ्या बैठकीतही त्या उपस्थित राहणार आहेत. सोबतच भोर शहरातील व तालुक्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेवून पक्ष संघटनेचा आढावा घेणार आहेत.