भोर तालुका सकल मराठा समाज यांच्यावतीने “गाव तिथे शाखा” उपक्रम; पहिल्याच टप्प्यात ३७ गावातील शाखेचा उद्या शुभारंभ
भोर : भोर तालुका सकल मराठा समाज यांच्यावतीने “गाव तिथे शाखा” उपक्रम राबवण्यात येणार आहे. हिंदवी स्वराज्याची शपथ छत्रपती शिवाजी महाराज यांनी घेतलेल्या रायरेश्वर येथे महादेवाचे दर्शन घेऊन या ऐतिहासिक क्षणाची सुरुवात उद्या रविवारी (दि. ७ जानेवारी) सकाळी ८:३० वाजता होणार आहे.
भोर तालुक्यात एकाच दिवशी ३७ गावांमध्ये ३७ शाखेचा शुभारंभ भोर तालुका सकल मराठा समाज यांच्यावतीने करण्यात येणार आहे. आरक्षणाबरोबरच समाजाच्या आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य, कृषी, क्रीडा इ. क्षेत्रातील प्रगतीसाठी प्रत्यक्षरीत्या संघटनात्मक कार्य सुरू करण्याच्या दृष्टीने गाव तिथे शाखा यांच्या माध्यमातून आपण इथून पुढे काम चालू करीत आहोत. त्याचाच एक भाग म्हणून पहिल्या टप्प्यात हिरडस मावळ खोऱ्यातील ३७ गावात शाखा सुरू करण्यात येणार असल्याचे सकल मराठा समाज अध्यक्ष संजय भेलके यांनी सांगितले.
निगुडघर येथे पहिल्या शाखेचा शुभारंभ होणार असून शेवटी आपटी व भावेखल येथील गावातील शाखा सुरु करून कार्यक्रमाची सांगता होणार आहे. या कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या बांधवांसाठी स्नेह भोजनाचेही आयोजन करण्यात आले आहे. समाज उन्नतीसाठी या ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार होऊन मराठा समाजाने हजारोंच्या संख्येने उपस्थित राहावे ही विनंती अध्यक्ष भेलके यांच्या वतीने करण्यात आली आहे.
शाखा सुरू होणाऱ्या गावांची नावे पुढीप्रमाणे
निगुडघर, देवघर, वेणूपुरी, कोंढरी, हिर्डोशी, कारुंगण, वारवंड, शिरगाव, अशिंपी, उंबर्डे, शिळीम, राजिवडी, अभिपुरी, दुर्गाडी, कुडली बु।।, कुडली खुर्द, शिरवली हि.मा, माझेरी, पन्हर खु, पहर बु।।, गुढे, निवंगण, कंकवाडी, धारांबे, रायरी, साळव, म्हसर बु।।, म्हसर खु, गोळेवाडी, करंजगाव, आपटी व भावेखल.