शरद मोहोळ खून प्रकरण: मामाच्या अपमानाचा भाच्याने घेतला बदला, कधी पासून सुरू होते प्लॅनिंग? काय आहे सविस्तर प्रकरण वाचा

पुणे : शरद मोहोळ याचा खून करण्यासाठी मुख्य आरोपी साहिल उर्फ मुन्ना पोळेकर याने मोहोळचा विश्‍वास प्राप्त करुन त्याच्या टोळीत शिरकाव केला होता. मागील महिनाभर तो सातत्याने मोहोळ याच्या बरोबर पंटर म्हणून वावरत होता.

दोघे जेवणही एकत्रच करायचे. मात्र संधी मिळाताच मुन्नाने शरद मोहोळचा गेम केला. मोहोळचा खून करुन मुन्नाने आपल्या मामाच्या अपमानाचा बदला घेतला. यामुळे त्याला ना खुनाचा खेद ना खंत होती. याउलट त्याने खून केल्यावर कायदेशीर प्रक्रियेसाठी अगोदरच वकिलांशी सल्ला मसलत केली होती. खुनाच्या अगोदर दोन दिवस तो वकिलांच्या संपर्कात होता. इतकेच नव्हेतर खून केल्यानंतर तो पळून जातानाही वकिलांसोबतच सापडला.

शरद मोहोळ आणि आरोपी मुन्नाचा मामा नामदेव कानगुडे यांचे दहा वर्षापासूनचे वैमनस्य आहे. मोहोळच्या पंटर लोकांनी नामदेव कानगुडेला मोहोळच्या सांगण्यावरुन दहा वर्षापुर्वी मारहाण केली होती. तसेच हिंजवडी येथील एका जागेच्या व्यवहारातील कमिशनवरुन त्यांच्यातील वादही पेटला होता. मोहोळ कारागृहात अंडा सेलमध्ये असल्याने मधल्या काळात त्यांना काही करता आले नाही.

दरम्यान मोहोळ कारागृहातून बाहेर आल्यावर मागील काही महिने ते संधीच्या शोधात होते. मोहोळ बाहेर आल्यापासून उघडपणे परिसरात फिरत होता. त्याने इतर टोळ्यांशी जुळवून घेतले होते. तसेच तो राजकारण आणि जमिनीच्या व्यवहारात जम बसवू पहात होता. नेमकी हीच संधी साधून कानगुडेने आपला भाचा मुन्नाला मोहोळच्या जवळ जाण्याचा सल्ला दिला. त्यानूसार मुन्ना मागील महिनाभर मोहोळसोबत सावलीसारखा वावरत होता.

Advertisement

तो मोहोळला काय हवे नको ते पहाण्याबरोबरच विवाह, समारंभ आणि देवदर्शन आदी सर्व ठिकाणी तो सोबत असायचा. इतकेच नव्हे तर जेवताणाही दोघे एकत्रच असायचे. अशाप्रकारे मुन्नाने मोहोळचा पुर्ण विश्‍वास जिंकला होता. दरम्यान मुन्ना सोबत कट्टा घेऊन फिरु लागला. मात्र मोहोळला तो आपल्या संरक्षणासाठीच बाळगत असल्याचे समज झाला. त्याच्या मनातही हे नव्हते की मुन्ना कधी आपला गेम करेल.

दरम्यान मामा भाच्यांनी पध्दतशीरपणे कट आखून माणसांची जुळवा जुळव केली. यामध्ये एक विठ्ठल गांदले हा छायाचित्रकारही होता. त्यालाही शरद मोहोळने एकदा मारहाण केली होती. त्यामुळे त्याच्या मनातही बदल्याची भावना होती. ठरल्यानूसार एका बेसावध क्षणी मुन्नाने दोघा साथीदारांच्या मदतीने तीन पिस्तुलातूंन तब्बल पाच गोळ्या झाडत मोहोळचा खून केला.

इन्टावरील पोस्टवरुन चित्र उघड –
मुख्य आरोपी मुन्ना बी.ए.च्या प्रथम वर्गात शिक्षण घेतो. त्याने काही महिण्यापुर्वी ३०२ करणार आणि येवरड्यात जाणार अशी पोस्ट केली होती. तर एकदा येरवडा कारागृहत असलेल्या सहकाऱ्यांना उद्देशून तुमची खुप आठवण येते असे म्हटले होते. त्याने मामा कानगुडेबरोबरचा फोटोही इंन्टावर टाकला होता. इतकेच नव्हे तर खून करुन पळूण जाताना गाडी चालवताना केलेला व्हिडिओही इंन्टावर टाकला होता.

आगामी महापालिकेच्या निवडणूकीत सत्ताधारी पक्षाकडून स्वत:ला किंवा पत्नीला तिकीट मिळविण्याच्या तयारीतही तो होता. यामुळे त्याच्या खूनामागे काही राजकीय कारण आहे का? हा ॲंगलही पोलीस तपासत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page