शिवसेना (उ.बा.ठा.) पुणे जिल्हा युवासेना सचिव पदी रोहिदास(आबा) कोंडे यांची निवड
खेड शिवापूर : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने शिवसेना (उ.बा.ठा.) नेते, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते बारामती लोकसभेतील युवासेना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.
भोर तालुक्यातील कासुर्डी खे.बा. येथील रोहिदास(आबा) पांडुरंग कोंडे यांच्या सामाजिक आणि राजकीय कार्याची दखल घेऊन त्यांची पुणे जिल्हा सचिव पदी निवड करण्यात आली आहे. पुणे जिल्हा सचिव पदावर काम करण्याची संधी दिल्या बद्दल रोहिदास कोंडे यांनी पक्षप्रमुख, युवासेनाप्रमुख आणि पक्ष श्रेष्ठींचे आभार मानले. युवासेनेचा आवाज बुलंद करण्यासाठी व गोरगरीब शेतकरी, कामगार, दीन-दुबळ्या पिडीत जनतेला न्याय मिळवून देऊन शिवसेना (उ.बा. ठा.) गटाची पुणे जिल्ह्यातील ताकद अजून मजबूत करणार असल्याचे त्यांनी सांगितले.