शिवसेना (उ.बा.ठा.) पुणे जिल्हा युवा अधिकारी पदी आदित्य बोरगे यांची निवड
नसरापूर : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना (उ.बा.ठा.) नेते, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते बारामती लोकसभेतील युवासेना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.
करंदी खे.बा.(ता.भोर) येथील आदित्य प्रकाश बोरगे यांच्या भोर तालुक्यातील सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांची पुणे जिल्हा युवा अधिकारी पदी निवड करण्यात आली आहे. वरूनजी सरदेसाई, आदित्यजी शिरोडकर यांच्या वतीने सचिन भाऊ अहिर, शिवसेना जिल्हा प्रमुख शंकर भाऊ मांडेकर, कुलदीप तात्या कोंडे, पश्चिम महाराष्ट्र युवासेना सचिव अविनाश भाऊ बलकवडे यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेनेचा आवाज बुलंद करण्यासाठी आदित्य बोरगे यांची निवड करण्यात आली आहे. पुणे जिल्हा युवा अधिकारी पदावर काम करण्याची संधी दिल्या बद्दल आदित्य बोरगे यांनी पक्षप्रमुख, युवासेनाप्रमुख आणि पदाधिकाऱ्यांचे आभार मानले. युवासेनेचा आवाज बुलंद करण्यासाठी व गोरगरीब शेतकरी, कामगार, पिडीत जनतेचे प्रश्न सोडवून शिवसेना (उ.बा.ठा.) गटाची भोर तालुका व पुणे जिल्ह्यातील ताकद अजून मजबूत करणार असल्याचे त्यांनी सांगितले.