नसरापूर ग्रामपंचायतीची दिव्यांग निधी खर्चात अनियमीतता; सन २०१४ ते २०२३ कालावधीचा तब्बल साडेतीन लाख निधी दिव्यांगांना दिलाच नाही, संबंधीतांवर शासन नियमानुसार गुन्हे दाखल करण्याची मागणी

नसरापूर : नसरापूर ग्रामपंचायतीने दिव्यांग कल्याण निधी मध्ये अनियमीतता करून १८ दिव्यांग लाभार्थ्यांना लाभा पासून वंचित ठेवले आहे. नसरापूर ग्रामपंचायतीच्या अधिकारी आणि पदाधिका-यांनी सन २०१४-१५ ते २०२२-२३ या कालावधीतील ३६४९९२ रुपये च्या निधीचा लाभ दिव्यांगाना दिलाच नाही, तर कागदी घोडे नाचवत आणि वरिष्ठांचे मार्गदशनाचे नावाखाली वेळकाढू पणा केला असून वरिष्ठ अधिकारी कनिष्ठांना पाठीशी घालत असल्याचे दिसून येत आहे. अशा कामचुकार अधिका-यांवर गुन्हे दाखल करून शासकीय नियमानुसार कारवाई करण्याची मागणी सोमनाथ उकिरडे यांनी केली आहे.


महाराष्ट्र राज्य शासन निर्णय दि. २५ जून २०१८ मधील मार्गदर्शक सुचना नुसार ग्रामपंचायतीच्या एकुण स्वउत्पनातील दिव्यांगांच्या विकासासाठी ३ टक्के ५ टक्के निधी दिव्यांग लाभार्थीच्या वैयक्तीक व सामुहिक कल्याणासाठी १०० टक्के खर्च करणे बंधनकारक आहे. तसेच लेखा संहिता २०११ ला अधिन राहुन सदरचा खर्च पुर्ण करणे अपेक्षीत आहे. परंतु नसरापूर ग्रामपंचायतीने सन २०१४-१५ ते २०२२-२३ या कालावधीत ३६४९९२ इतका निधी कमी खर्च केला आहे. तसेच सदर निधी खर्चाबाबत वेळोवेळी शासकीय लेखापरिक्षणात त्रुटी दाखविल्या असताना ग्रामपंचायत अधिकारी आणि पदाधिकारी यांनी टोलवाटोलवी करून दिव्यांगांना न्याय हक्कापासून वंचित बंचीत ठेवले आहे. या बाबत नसरापूर ता. भोर येथील सामाजिक कार्यकर्ते सोमनाथ उकिरडे यांनी सन २०२१ पासून सदर बाबीचा पाठपुरावा केला असता ही सत्य स्थिती उजेडात आली.

Advertisement


सोमनाथ उकिरडे यांनी नसरापूर ग्रामपंचायतीकडे दिव्यांगांच्या निधीचा खर्चाची माहीती सन २०२१ पासून विचारत असून त्याला शासकीय कर्मचा-यांनी टोलवाटोलवी करत २०२३ साल उजाडले तरी वेळेवर माहीती दिली नाही केवळ कागदी घोडे नाचवत वेळकाढू धोरण अवलंबले असा आरोप उकिरडे यांनी केला आहे. भोर तालुका गटविकास अधिकारी किरणकुमार धनवडे यांनी दि. ११ नोव्हेंबर २०२३ रोजी ग्रामपंचायत कार्यालयात प्रत्यक्ष भेट देवून मन २०१४ ते २०२३ या कालावधीतील दिव्यांग निधीची माहीती घेवून ३६४९९२ इतका निधीचा अनुषेश बाकी असल्याचे कबुल केले असून सदर निधी नियमानुसार खर्च करण्याच्या सुचना नसरापूर ग्रामपंचायतिला दिल्या आहेत.

सन २०१४-२०१५ पासुन ते सन २०२२-२०२३ या कालावधीतील दिव्यांगांना ३ टक्के व ५ टक्के वैयक्तीक लाभाचा निधी तत्कालीन व विद्यमान कार्यकारी पदाधिकारी यांच्या निर्णयानुसार खर्च करण्यात आला असून उर्वरीत सार्वजनिक स्वरूपाचा लाभाचा निधी खर्च करणे अदयाप बाकी आहे. सदरचा निधी खर्च करण्या बावत विद्यमान कार्यकारी पदाधिकारी मासिक सभेत निर्णय घेवून मार्च २०२४ च्या आत खर्च करणार आहे.
-विजयकुमार कुलकर्णी, ग्रामविकास अधिकारी ग्रामपंचायत नसरापूर
सन २०१४ ते २०२३ या कालावधीत नसरापूर ग्रामपंचायतीने दिव्यांग कल्याण निधी खर्चामध्ये अधिकारी आणि पदाधिकारी यांनी संगनमताने जाणून बुजून जाणीव पुर्वक दिव्यांगांना त्रास देण्याच्या अनुषंगाने ३ टक्के व ५ टक्के निधीचा संपूर्ण खर्च केलेला नाही. त्यामुळे सर्व संबंधीतांवर शासन नियमाप्रमाणे गुन्हे दाखल करून त्यांना बडतर्फ करण्यात यावे.
-सोमनाथ उकिरडे, सामाजिक कार्यकर्ते नसरापूर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page