मांढरदेवी यात्रेच्या पार्श्भूमीवर पार पडली प्रशासनाची बैठक, २४, २५ व २६ जानेवारी रोजी पार पडणार यात्रा; सर्व विभाग प्रमुखांनी समन्वयाने काम करण्याच्या राजेंद्रकुमार जाधव यांनी दिल्या सूचना

वाई : राज्यातील व राज्याबाहेरील भाविकांच्या श्रध्देचे स्थान असलेल्या सातारा जिल्हयातील वाई तालुकेतील मांढरदेव येथील श्री क्षेत्र काळेश्वरी देवीची सन २०२४ मधील यात्रा दिनांक २४, २५ व २६ जानेवारी २०२४ रोजी  मांढरदेव गड येथे पार पडणार आहे.

सदर यात्रेच्या अनुषंगाने येणा-या भाविकांना जिल्हा प्रशासनाच्या वतीने विविध सेवा / सुविधा पुरविन्यात याव्यात, अशा सूचना वाईचे उपविभागीय अधिकारी राजेंद्रकुमार जाधव यांनी दिल्या. वाई येथे उपविभागीय अधिकारी राजेंद्रकुमार जाधव यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी सकाळी ११ वाजता मौजे मांढरदेव, ता. वाई, जि. सातारा येथे बैठक आयोजीत करण्यात आली होती.

उपस्थित सर्व अधिकारी यांना त्यांनी केलेल्या नियोजनाबाबत व त्यांचे कार्यरत असलेल्या कर्मचारी यांना निश्चित करुन दिलेल्या व द्यावयाच्या जबाबदार-या बाबत आढावा घेण्यात आला. तसेच यापुढे करावयाच्या विविध कामाबाबत व निश्चित करावयाच्या जबाबदा-याबाबत संक्षिप्त स्वरुपात सूचना देऊन यात्रा कालावधी संपेपर्यत कोणत्याही विभागांच्या कार्यालय प्रमुखांकडून पार पाडावयाच्या जबाबदा-या व कामाबाबत हलगर्जीपणा करु नये तसेच सर्व काम यात्रेपूर्वी विहित मुदतीत पूर्ण केलेजातील याची दक्षता घ्यावी. तसेच जिल्हाधिकारी सातारा यांच्या अध्यक्षतेखाली यापुढील होणा-या बैठकीपूर्वी संबंधित सर्व विभागांचा आढावा घेतला जाणार असल्याने संबंधित विभागांना नेमून दिलेली कामे विहित मुदतीत पूर्ण करणेबाबतच्या सूचना सर्व विभाग प्रमुखांना देण्यात आल्या.

Advertisement

सदर बैठकीस बाळासाहेब भालचिम उपविभागीय पोलीस अधिकारी वाई, सोनाली मेटकरी तहसिलदार वाई, सचिन पाटील तहसिलदार भोर, देविदास ताम्हाणे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सातारा, बाळासाहेब भरणे पोलीस निरिक्षक वाई, नारायण घोलप गट विकास अधिकारी, पंचायत समिती वाई, किरणकुमर धनावडे, गट विकास अधिकारी, भोर तसेच वाई जिल्हा सातारा व भोर, जिल्हा पुणे तालुक्यामधील राज्य उत्पादन शुल्क, पोलीस विभाग, आरोग्य विभाग, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, उपप्रादेशिक परिवहन विभाग, अन्न व औषध प्रशासन, सहाय्यक कामगार, पशुसंवर्धन, दुरसंचार,जि.प.बांधकाम विभाग, सां.बा. बांधकाम विभाग, जीवन प्राधिकरण, नगरपालीका प्रशासन, विदयुत वितरण, ग्रामीण पाणी पुरवठा, वन विभाग, सिक्युरिटी फोर्स, तसेच सरंपच व सचिव मांढरदेव देवस्थान उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page