मुख्यमंत्री “माझी लाडकी बहीण योजने”करीता भोर तालुक्यातून २७ हजार ३२९ अर्ज तर संपूर्ण पुणे जिल्ह्यातून ९ लाखाहून अधिक अर्ज प्राप्त; अर्जांची छाननी सुरू

पुणे : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेकरीता पुणे जिल्ह्यातील २१ ते ६५ वयोगटातील महिलांनी ९ लाख १५ हजार ९३९ अर्ज सादर केले असून अर्जाची छाननी प्रक्रिया मोहीम स्तरावर सुरू करण्यात आली आहे. यावेळी भोर तालुक्यातून – २७ हजार ३२९, वेल्हा(राजगड) – ६ हजार ८४१, मुळशी – २५ हजार ५५२, पुरंदर – ३५ हजार ८५९, हवेली ३ लाख ३२ हजार ३८७, पुणे शहर – ७१ हजार ४१४, बारामती – ६५ हजार १०४, इंदापूर – ६० हजार २०४, जून्नर – ५६ हजार ३८, शिरुर – ५४ हजार ५५५, खेड – ५१ हजार २१७, दौंड – ४८ हजार ७६२, मावळ – ४३ हजार ८८, आणि आंबेगाव – ३७ हजार ४१७, असे एकूण ९ लाख १५ हजार ९३९ अर्ज सादर करण्यात आले आहेत.

Advertisement

अर्ज छाननी प्रक्रियेस सुरुवात
जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांच्या निर्देशानुसार सर्व तालुक्यात प्राप्त अर्जाची छाननी प्रक्रिया सुरू झाली आहे. ही प्रक्रिया प्रत्येक पात्र महिलेचा अर्ज तपासून तिला लाभ मिळेपर्यंत सुरू राहणार आहे. पात्र महिलांना वेळेवर लाभ मिळावा यासाठी अर्ज भरून घेण्यासोबत अर्जाची छाननी सुरू करण्यात आली आहे. अर्जात त्रुटी असल्यास दुरुस्ती करण्यासही संधी असून प्रत्येक पात्र महिलेला लाभ देण्यात येणार असून अर्जात त्रुटी असल्यास अशा महिलांनी भ्रमणध्वनीवर प्राप्त झालेल्या संदेशाचे व्यवस्थितरित्या वाचन करून त्या संदेशात दिलेल्या सूचनेप्रमाणे अर्जात दुरुस्ती करावी तसेच मागणी केलेली कागदपत्रे जोडून अर्ज फेरसादर करावा. असे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी मोनिका रंधवे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page