रस्त्यावरील अपघात कमी करण्यासाठी; राष्ट्रीय सडक सुरक्षा अभियानास सुरवात
शिरवळ : रस्ता सुरक्षेबाबत लोकांमध्ये जनजागृती व्हावी या उद्देशाने दरवर्षी देशात रस्ता सुरक्षा अभियान राबवले जाते. रस्त्यावरील अपघात कमी करण्यासाठी राष्ट्रीय सडक सुरक्षा अभियान रबविण्यास सुरुवात करण्यात आली आहे. ओरिएंटल यिस्ट इंडिया प्राईव्हेट लिमिटेड कंपनी (केसूर्डी ता.खंडाळा) येथे या बाबत सर्वांना रस्ता सुरक्षाबाबत मोलाचे मागदर्शन मंगळवारी (दि. १६ जानेवारी) करण्यात आले. हे अभियान १५ जानेवारी ते १४ फेब्रुवारी या दरम्यान राबवले जाणार आहे. सुरक्षितता ही फक्त घोषणा नाही, तर जीवनाचा एक मार्ग आहे. रस्ता सुरक्षेबाबत लोकांमध्ये जनजागृती व्हावी या उद्देशाने, रस्त्यांवरील अपघात आणि मृत्यूची संख्या कमी करण्यासाठी वाहतुकीचे नियम सांगून. सीट बेल्ट, हेल्मेट आणि इतर सुरक्षा उपायांच्या वापरास प्रोत्साहन देण्यासाठी या अभियानात माहिती सांगण्यात आली. उप प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रादेशिक परिवहन विभाग,पुणे अनिल वलिव यांनी ओरिएंटल यिस्ट इंडिया प्राईव्हेट लिमिटेड कंपनी तील सर्वांना रस्ता सुरक्षबाबत बाबत मोलाचे मागदर्शन केले.
तसेच त्या अंतर्गत पुणे सातारा टोल रोड प्रा. ली. तर्फे NH-४८ अमित भाटिया विभागीय प्रमुख, बद्रिप्रसाद शर्मा उप विभागीय प्रमुख, अभिजीत गायकवाड रूट ऑपरेशन मॅनेजर पुणे विभाग, संकेत गांधी रूट ऑपरेशन मॅनेजर सातारा विभाग, राकेश कोळी जनरल मॅनेजर यांनी M/s. ओरिएंटल यिस्ट इंडिया प्राईव्हेट लिमिटेड खंडाळा MIDC इथे रस्ता सुरक्षा या विषयावर कर्मचाऱ्यांना योग्य असे मार्गदर्शन केले.
त्यावेळी कंपनीतर्फे सचिन काटकर(HR हेड), असिफ चिपळूणकर(फॅक्टरी मॅनेजर), राहुल रत्नपारखी (जनरल मॅनेजर प्रोड्कशन), रवींद्र धोत्रे (EHS हेड), मिलिंद जाधव (सेफ्टी ऑफिसर), अनुप हळभवी (HR ऑफिसर) हे सर्व अधिकारी व कर्मचारी स्टाफ उपस्थित होते.