भोर येथील श्री स्वामी समर्थ मंदिरात भव्य प्रकटदिन सोहळ्यास आजपासून सुरुवात
भोर : येथील अक्कलकोट श्री स्वामी समर्थ मंदिरात आज बुधवार(दि. ३ एप्रिल) ते मंगळवार(दि. ९ एप्रिल) श्री स्वामी समर्थ अखंड नामजप सोहळा (७ दिवस सप्ताह) आयोजित करण्यात आला आहे. ॐ श्री स्वामी समर्थ भक्ती ट्रस्ट, संजयनगर, भोर यांच्या वतीने या भव्य प्रकटदिन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रम प्रसंगी बुधवार(दि.३ एप्रिल)सकाळी ८ वाजता श्री स्वामी समर्थ सहस्त्र स्वाहाकार (होमहवन).
गुरुवार(दि. ४ एप्रिल) सकाळी ८ वाजता श्री स्वामी चरित्र सारामृत पोथीचे सामुदायिक पारायण दुपारी ४.३० वाजता भजनसेवा श्री वाघजाई भजनी मंडळ, भोर.
शुक्रवार(दि. ५ एप्रिल)सायं. ५ वाजता श्री सुक्त पठण- राजा रघुनाथराव विद्यालय, भोर.
शनिवार (दि. ६ एप्रिल) सायं. ५ वाजता श्री सुक्त पठण श्री रेणूका श्री सुक्त मंडळ,भोर.
रविवार(दि.७ एप्रिल) सायं. ७ वाजता श्री स्वामी समर्थ तारकमंत्र सामुदायिक पठण.
सोमवार (दि. ८ एप्रिल) सायं. ७ वाजता श्री शिवमहारुद्र महापुजा व भस्म आरती.
मंगळवार (दि. ९ एप्रिल)सायं. ७ वाजता भजन ह.भ.प. श्रुतिका बोरुडे स्वरांजली ग्रुप मॉडेल कॉलनी पुणे.
बुधवारी (दि. १० एप्रिल)पहाटे ५.३० वाज -काकडा आरती (श्री स्वामी मुर्तीस) सकाळी ७ वाजता श्रींच्या मुर्तीस महारुद्र दुग्ध अभिषेक, सकाळी ८ वाजता श्री स्वामी समर्थ सहस्त्र स्वाहाकार (होमहवन) श्रींच्या पादुकास चंदन लेपन,सकाळी ९ वाजता श्रींच्या निर्गुण पादुकास महाअभिषेक, वस्त्रअलंकार व अत्तर गंधलेपन शिवलींगास सहस्त्रधारा दुग्ध अभिषेक श्री शंकर महाराज मुर्तीस महाअभिषेक व वस्त्रअलंकार अर्पण श्री महालक्ष्मी व तुळजाभवानीमाता महाअभिषेक व वस्त्रअलंकार महापुजा श्री महागणपती मुर्तीस महाअभिषेक व वस्त्रअलंकार श्री स्वामी समर्थ पादुकास महाअभिषेक व अत्तर लेपन, सायं ५.३० ते ६.३० वाजता श्री स्वामी समर्थ भव्य पालखी सोहळा (मंदिर प्रदक्षिणा),सायं ६.३० वाजता श्री स्वामी समर्थ महाआरती,भजनसेवा–सायंकाळी ७ ते रात्री ९ पर्यंत श्री वाघजाई भजनी मंडळ, भोर तसेच सायं ७ पासून–भव्य महाप्रसाद रात्री १० वाजेपर्यंत–श्री स्वामी समर्थ शेजारती आयोजन करण्यात आल्याचे ॐ श्री स्वामी समर्थ भक्ती ट्रस्ट वतीने सांगण्यात आले.