मनोज जरांगे पाटील मुंबईच्या दिशेने रवाना; भोर तालुक्यातील सकल मराठा समाज मुंबई दौऱ्यात मोठ्या संख्येने सहभागी होणार. कसे असेल नियोजन? वाचा सविस्तर
भोर : मनोज जरांगे पाटील अंतरवाली सराटीतून मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. कोणी घरी राहू नका ही शेवटची आर-पारची लढाई आहे, असे आवाहन त्यांनी केले आहे. आंदोलन मार्गावर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. २६ जानेवारीला मराठा आंदोलक मुंबईत धडकणार आहेत. मराठा आंदोलकांसह मनोज जरांगे पाटील यांनी आज मुंबईच्या दिशेने कूच केली आहे. यासाठी सर्व तयारी करण्यात आली आहे.
याच पार्श्वभूमीवर सकल मराठा समाज भोर यांनी जरांगे पाटील यांच्या मुंबई दौऱ्यात भोर तालुक्यातून मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे निश्चित केले आहे. त्यानुसार मुंबई दौऱ्यात सहभागी होणाऱ्यांनी बुधवारी (दि.२४ जानेवारी) रोजी सकाळी ७ वाजता शिवतीर्थ चौपाटी येथे उपस्थित राहण्याचे आवाहन भोर तालुका सकल मराठा समाज अध्यक्ष संजय भेलके आणि प्रतिनिधी यांनी केले आहे.
मुंबई दौऱ्यात सहभागी होणाऱ्यांसाठी सकल मराठा समाज यांच्या वतीने जाहीर केलेली नियमावली खालीलप्रमाणे
१) सोमवारी (दि.२२ जानेवारी) सायं. ५ वाजेपर्यंत खाली दिलेल्या संपर्क क्रमांकावर आपली नावे व संख्या कळवावी.
सारंग शेटे – ९८५०६१२१३९, भालचंद्र मळेकर – ९९२२३७५२८०, सोमनाथ ढवळे – ९८२२६५६५१९, कुणाल धुमाळ – ९८५०१२०६२२, सुनील चोरघे – ७३५०२८२०३०
२) प्रत्येकाने प्रवासासाठी आपले वाहन (गाडी) आणावी व त्यात बसणाऱ्या लोकांची संख्या व नावे कळवावी,
३) प्रवासाचा खर्च स्वतः करणे आहे उदा: पेट्रोल, डिझेल इ.
४) प्रवासात संपूर्ण चहा, नाष्टा, जेवण हा खर्च सकल मराठा समाज भोर तालुका यांच्या तर्फे करण्यात येईल.
५) प्रवासाला येताना आपल्याला लागणारे औषधोपचार स्वःताबरोबर आणावेत.
६) प्रवासात लागणाऱ्या अंथरूण पांघरूण थंडीसाठीचे साहीत्य काळजीपुर्वक आणावे.
७) गाडीवर भगवा झेंडा लावून दिनचर्यसाठी लागणारे सर्व साहीत्य सोबत आणावे.
८) वाहनचालकाने वाहन परवाना व सर्व कागदपत्रे सोबत ठेवावीत.