कांबरे खे.बा. येथील १ कोटी ९२ लक्ष किंमतीच्या पाणी पुरवठा योजनेच्या कामाचे भूमिपूजन आमदार संग्राम थोपटे यांच्या हस्ते संपन्न
नसरापूर(प्रतिनिधी) : भोर तालुक्यातील कांबरे खे.बा. येथील जल जीवन मिशन योजनेंतर्गत रु.१ कोटी ९२ लक्ष निधीतून मंजूर केलेल्या पाणी पुरवठा योजनेच्या कामाचे भूमिपूजन आज रविवारी (दि.२१जानेवारी) दुपारी १२ वाजता आमदार संग्राम थोपटे यांच्या हस्ते करण्यात आले. तालुक्याच्या विकासासाठी कायम कटिबद्ध असल्याची ग्वाही त्यांनी या वेळेस दिली.
या कार्यक्रम प्रसंगी राजगड सहकारी साखर कारखान्याचे व्हा.चेअरमन पोपटराव सुके, संचालक शिवाजीनाना कोंडे, अशोक आबा शेलार, भोर पंचायत समितीचे मा.उपसभापती लहुनाना शेलार, भोर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक रणजित बोरगे, विठ्ठल गोरे, कारखान्याचे मा.संचालक दिलीपराव कोंडे, सा.कार्यकर्ते माऊली पांगारे, ईश्वर पांगारे, बाबू झोरे यांच्यासह सरपंच सागर शिंदे, उपसरपंच पार्वती यादव, ग्रामपंचायत सदस्य श्रीरंग कोंढाळकर, प्राचीताई महांगरे, संगिता कोंढाळकर, नंदा निगडे, दशरथ मांढरे, पो.पाटिल सुमित कांबळे, तंटामुक्ती कमिटीचे अध्यक्ष रामदास बापु यादव, सा.कार्यकर्ते मयूर कोंढाळकर, कांताबापु यादव, प्रशांत मोहिते, अमर कोंढाळकर, प्रतिक शिंदे, दादा सणस, मामा पोमण, दादा कोंढाळकर, सोमनाथ धनावडे, प्रकाश यादव, आबासो मोहिते, संतोष निगडे, बापू नाईलकर, दादा शेलार, रामभाऊ गिरे, सुभाष मोहिते, उत्तमराव कोंढाळकर, राजाराम कोंढाळकर, दिपक शिंदे, साहेबराव चव्हाण, बापू कोकरे आदी ग्रामस्थ व कांबरेश्वर युवा प्रतिष्ठान कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन निवेदक विठ्ठल पवार यांनी केले तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक रामदास बापू यादव (मा. सरपंच) व सामाजिक कार्यकर्ते निलेश कोंढाळकर यांनी केले.