पुणे महाबळेश्वरपेक्षाही थंड; तापमानाचा पारा आज ८.६ अंशांखाली
पुणे : पुणे सध्या महाबळेश्वर पेक्षाही थंड आहे. पुण्यात आज देखील तापमानात मोठी घट झाली. शिवाजी नगर यह ८.६ तर राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या परिसरात ७.६ एवढे कमी तापमान नोंदवले गेले आहे.
पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातिल माळीन येथे ७.८, शिरूर मध्ये ७.४. तर बारामती येथे ८.७ तापमानाची नोंद झाली आहे. हवामान विभागाच्या पुणे वेधशाळेने पुढील काही दिवस आणखी तापमानात घट होण्याची शक्यता व्यक्त केली आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पुण्यात पुढील काही दिवस तापमानात आणखी घट होणार आहे. सध्या पुण्यात माळीन येथे सर्वात कमी ७. ४ तापमान नोंदवल्या गेले. पुण्यात पुढील काही दिवस आकाश मुख्यतः निरभ्र राहणार आहे. पुण्यात सकाळच्या सुमारास धुके आणि कडक थंडी जाणवत आहे. पुढील ४८ तासात पुण्यात धुके पडण्याचा इशारा देण्यात आला आहे. तर पुढील २४ तासात किमान तापमानात किरकोळ घट होण्याची शक्यता आहे. २९ जानेवारी पर्यंत किमान तापमान जास्त काही बदल होणार नाही, असे हवामान विभागाने म्हटले आहे.
सध्या उत्तर भारतात कमालीची थंडी पडत आहे. हे वारे राज्याच्या दिशेने येत असल्याने थंडी वाढली आहे. तर हवेची एक द्रोणीय रेषा ही दक्षिण कर्नाटका मधून विदर्भ व छत्तीसगड पर्यंत गेली आहे. पूर्व मध्य अरबी समुद्रावर उत्तर महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर हवेच्या वरच्या थरात एक चक्रीय स्थिती तयार झाल्यामुळे आद्राता देखील वाढली आहे. त्यामुळे पुढील काही दिवस राज्यात थंडी कायम राहणार आहे.
पुण्यात वडगावशेरी येथे १७, लव्हळे येथे १७, लोणावळा येथे १६.२, मगरपट्टा येथे १५.५, खेड येथे १४.७, कोरेगावपार्क १४.४, बालेवाडी १३.४, चिंचवड येथे १४.९, आंबेगाव येथे १०.० गिरीवन येथे १३.१, दापोडी येथे १३, नारायणगाव १०, हडपसर १२.२, शिरुर १२.८, डुडुळगाव १२.०१, भोर १२.२, तळेगाव १०.४, ढमढेरे १०.३, पुरंदर १०.९, दौंड ९,२, लवासा ११, इंदापूर ११.१, पाषाण ९.५, निमगिरी १०.२, बारामती ८.७, राजगुरुनगर ९.४, शिवाजी नगर ८.६, हवेली ७.८, एनडीए ७.६, माळीण ७.४ एवढ्या तापमानाची झाली.