आजचा मुक्काम वाशीतच! उद्या सकाळी १२ वाजता आंदोलनाची दिशा ठरवू – मनोज जरांगे पाटील.
वाशी येथील भाषणात त्यांनी सरकारकडे काय काय मागण्या केल्या? वाचा सविस्तर

मुंबई : मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात मराठा आरक्षणासाठी लाखोंच्या संख्येने मराठा बांधव शुक्रवारी सकाळी नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटमध्ये दाखल झाले. आज दुपारी ३ वाजता मनोज जरांगे पाटील आपली निर्णायक भूमिका स्पष्ट केली आहे. वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आपल्या भाषणात बोलताना जरांगे पाटील यांनी सरकारपुढे काही प्रमुख मागण्या केल्या आहेत.

भाषणात केलेल्या मागण्या खालीलप्रमाणे,

Advertisement

१) नोंद सापडणाऱ्यांच्या सोयऱ्यांनाही सरसकट प्रमाणपत्र द्या.
२) शपथपत्र घेऊनच सोयऱ्यांना प्रमाणपत्र द्या.
३) कोर्टात आरक्षण मिळेपर्यंत मुला-मुलींना १०० टक्के शिक्षण मोफत करा.
४) जिल्हास्तरावर वसतिगृह बांधा.
५) आरक्षण मिळेपर्यंत सरकारी भरती करु नका,केल्यास मराठा आरक्षणाच्या जागा राखीव ठेवा.
६) आंतरवालीसह राज्यातील सर्व मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्या.
७) SEBC अंतर्गत 2014 च्या नियुक्त्या त्वरित द्या.
८) वर्ग 1 व 2 आणि पोलीस उपनिरीक्षक पदाच्या नियुक्त्या द्या.
रात्रीपर्यंत शासननिर्णयाचे अध्यादेश सरकारने द्यावे, अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी भाषणात केली. आजची रात्र नवी मुंबईतच काढतो. उद्या शनिवारी(२७ जानेवारी) सकाळी १२ वाजता पुढील आंदोलनाची दिशा ठरवू असे शेवटी ते बोलले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page