राजगड तालुक्यातील निगडे येथून ३५ वर्षीय विवाहीत महिला बेपत्ता
राजगड : राजगड(वेल्हे) तालुक्यातील निगडे येथील एक ३५ वर्षीय विवाहीत महिला बेपत्ता झाली असल्याची घटना घडली आहे. दिपाली शशिकांत पांगारे असे या महिलेचे नाव आहे. शुक्रवारी (दि. १३ डिसेंबर) सायंकाळी पाचच्या सुमारास राहत्या घरातून कोणाला काहीही न सांगता त्या निघून गेलेल्या आहेत. दिपाली पांगारे या मानसिक दृष्ट्या थोड्याशा खचलेल्या आहेत. वर दिलेल्या फोटो मध्ये असलेल्या वर्णनाच्या या महिला कोणाला दिसल्यास वा आढळून आल्यास 9860662284 /7030883416 /8796537718 या क्रमांकांवर संपर्क करावा असे आवाहन पांगारे कुटुंबीयांनी केले आहे.